Share Market esakal
अर्थविश्व

Share Market: आता गुंतवणुकीची सुवर्ण संधी, या शेअरमध्ये होईल 40% टक्के वाढ; तज्ज्ञांचा विश्वास...

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने सोमानी सिरॅमिक्समधील गुंतवणुकीसाठी 740 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Share Market: सोमनी सिरॅमिक्सच्या (Somany Ceramics) शेअर्सने त्याच्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे, पण या वर्षी हे शेअर्स जवळपास 43 टक्क्यांनी घसरले आहेत. पण आता या शेअर्समध्ये 40 टक्के वाढ होईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने सोमानी सिरॅमिक्समधील गुंतवणुकीसाठी 740 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा 40 टक्के जास्त आहे. त्याचे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर 528.70 रुपयांवर बंद झाले होते.

23 जानेवारी 2009 रोजी सोमनी सिरॅमिक्सच्या शेअर्सची किंमत केवळ 8.40 रुपये होती. त्याची किंमत आता 528.70 रुपये झाली आहे. याचा अर्थ जानेवारी 2009 मध्ये एखाद्याने यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर सुमारे तेरा वर्षांत याचे शेअर्स 63 पटीने वाढून 63 लाख रुपये झाले असते. त्यामुळेच सोमनी सिरॅमिक्सचे शेअर्स लाँग टर्ममध्ये चांगला परतावा देत असल्याचे लक्षात येते. सध्या हे शेअर्स कमी किंमतीवर उपलब्ध असल्याने शेअर्समध्ये खरेदी करण्याची ही योग्य संधी असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. कारण येत्या काळात हे शेअर्स आणखी जोमाने वर येतील असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

गेल्या वर्षी 17 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचे शेअर्स 952.45 रुपयांवर होते, जे एका वर्षातील उच्चांक आहे. यानंतर, 23 जून 2022 रोजी, शेअर्सच्या विक्रीमुळे 46 टक्क्यांनी घसरून 512.50 रुपये झाले. पण त्यानंतर, चढ-उतारांच्या दरम्यान त्यात पुन्हा 3% वाढ झाली आहे पण सोमनी सिरॅमिक्सचे शेअर्स आणखी 40% वाढू शकतात असा विश्वास व्यक्त केला आहे. (Stock)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : मराठवाड्यात किती नगराध्यक्ष, किती नगरसेवक निवडून येणार? एका क्लिकवर वाचा

Lionel Messi India Visit : लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याने फुटबॉलप्रेमींना दिली प्रेरणादायी ऊर्जा

Nagar Parishad-Nagar Panchayat Elections Result : मतदान झालं, निकाल लागतोय; पण नगरपंचायत-नगरपरिषद यात फरक तरी काय?

Suryakumar Yadav Cricket Stats : हे ‘सूर्यग्रहण’ सुटायला हवे!

साप्ताहिक राशिभविष्य : २१ डिसेंबर २०२५ ते २७ डिसेंबर २०२५

SCROLL FOR NEXT