Today's Stock Market News | Share Market Updates Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स 586 तर निफ्टी 177 अंकांनी वधारला

आरबीआयच्या (RBI) या निर्णयानंतर शेअर बाजार कोसळला होता. परंतु आजच्या दिवसाच्या सुरुवातीला मात्र शेअर बाजार सावरला आहे.

सुरज सकुंडे

Share Market Live Updates: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी काल रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या (RBI) या निर्णयानंतर शेअर बाजार कोसळला होता. परंतु आजच्या दिवसाच्या सुरुवातीला मात्र शेअर बाजार सावरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या चिन्हात सुरु झाले. सेन्सेक्स 586.04 अंकाच्या वाढीसह 56,255.07वर सुरु झाला, तर निफ्टी 177.15 अंकांनी वधारून 16,854.75वर सुरु झाला. HINDALC, ONGC, TATASTEEL, HEROMOTOCOसह निफ्टी 50 मधील 41 शेअर्स आजच्या दिवसाच्या सुरुवातीला वधारले, तर NESTLEIND, TATACONSUM, NTPC, APOLLOHOSP यांसह 9 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

दरम्यान काल रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले. काल सेन्सेक्स 1,306.96 अंकांची म्हणजे 2.29 टक्क्यांच्या घसरणीसह 55.669.03 वर बंद झाला, तर निफ्टी तब्बल 391.50 अंकांच्या म्हणजेच 2.29 टक्क्यांच्या घसरणीसह 16677.60वर बंद झाला.

काल दिवसअखेर केवळ 5 शेअर्स हिरव्या चिन्हात बंद झाले तर 45 शेअरमध्ये घट झाली. सकारात्मक कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये ONGC, BRITANNIA, POWERGRID, NTPC, KOTAKBANK यांचा समावेश होता, तर APOLLOHOSP, ADANIPORTS, HINDALCO, TITAN, BAJAJFINCE सह 45 शेअर्स मोठ्या घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Prices: सणासुदीपूर्वी महागाईचा झटका! साखर-कांद्यानंतर आता डाळी महागल्या, जाणून घ्या नवे दर...

Sugar Stocks: साखर तुमच्यासाठी महागली, मात्र शेअर्ससाठी 'गोड' झाली! साखर कंपन्यांचे अनेक शेअर्स 52-Week High वर

Marathi News Live Updates : भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

MHADA: भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण; म्हाडाचे घर भाड्याने कसे घेता येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT