Todays Share Market Updates sakal
अर्थविश्व

'फेड'कडून झालेल्या व्याजदरवाढीनंतर Share Market मध्ये तेजी

व्याजदरवाढीची अपेक्षा या आधीच असल्याने सोमवारपासूनच शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

फेडरल रिजर्व्हकडून मोठी व्याजदरवाढ झाल्याने शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे. व्याजदरवाढीची अपेक्षा या आधीच असल्याने सोमवारपासूनच शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू आहे. आज सेन्सेक्स 600 अंकाच्या घसरणीसह 53, 141 वर सुरू झाला तर निफ्टी 155 अंकाच्या घसरणीसह 15,848 वर सुरू झाला. त्यानंतर थोड्याच वेळात शेअर बाजारात तेजी दिसून आली. फेडरल रिजर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ झाल्याने आज बाजारात अस्थिरता दिसून येईल असा अंदाज तंज्ञानी व्यक्त केलाय. (share market opening update 16 june 2022)

बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी काहीशा घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये हलकी खरेदी झाली. ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसली तर रियल्टी, एनर्जी, मेटल शेअर्स घसरले. बुधवारच्या बाजारात सर्वात जास्त दबाव आयटी, एफएमसीजी शेअर्सवर होता. निफ्टीच्या 50 पैकी 26 शेअर्सची विक्री झाली. त्याच वेळी सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स घसरले. निफ्टी बँकेच्या 12 शेअर्सपैकी 8 शेअर्समध्ये घसरण झाली.

सेन्सेक्स 152 अंकांनी घसरून 52541 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 40 अंकांनी घसरून 15692 वर बंद झाला आहे. निफ्टी बँक 28 अंकांनी वाढून 33,339 वर बंद झाला. तर मिडकॅप 93 अंकांनी वाढून 26809 वर बंद झाला.

यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्के वाढ जाहीर केली आहे. 28 वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिकेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कठोर पाऊल यूएस फेडरल बँकने उचलले आहे. अमेरीकेत महागाई दर हा 40 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. मे महिन्यात हा महागाई दर 8.6 टक्के नोंदवला गेला. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या या सेंट्रल बँकेने यावर तोडगा म्हणून व्याजदरात वाढ केली आहे.

0.75 टक्क्यांनी झालेली ही व्याजवाढ ही 1994 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. सध्या यूएस फेडच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे भारतीय चलनावर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCORP)
ग्रासिम (GRASIM)
ओएनजीसी (ONGC)
एनटीपीसी (NTPC)
इन्फोसिस (INFY)
रिलायन्स (RELIANCE)
विप्रो (WIPRO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT