share market
share market esakal
अर्थविश्व

Share Market Opening: शेअर बाजारात 'अच्छे दिन', सेन्सेक्स, निफ्टीची भरारी

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारातील तेजी कायम असून सेन्सेक्स, निफ्टी वधारलेला दिसून येत आहेत. सेन्सेक्स 123 अंकांनी वधारून 62820 अंकावर खुला झाला. तर, निफ्टीदेखील 18659 अंकांवर खुला झाला आहे. सकाळच्या सत्रात 33 शेअर्स तेजीत दिसून येत आहेत. तर 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

मंगळवारी बाजारात सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात तेजी पाहायला मिळाली. बाजाराने इंट्राडेमध्ये पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठला. फार्मा, मेटल आणि एफएमसीजी शेअर्समध्ये दमदार खरेदी दिसून आली.

शेवटी सेन्सेक्स 177.04 अंकांच्या वाढीसह 62681.81 वर आणि निफ्टी 55.20 अंकांच्या अर्थात 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 18618 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्स-निफ्टीने इंट्रा-डेमध्ये नवा रेकॉर्ड बनवला. पण ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या तासात प्रॉफिट बुकींगमुळे बाजार किंचित वाढून बंद झाला.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बाजारात तेजी कायम राहिली असली तरी अस्थिर बाजारात गुंतवणूकदार सावध दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. चीनमध्ये वाढत्या विरोधामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे. परिस्थिती सुधारली नाही तर त्याचा भारतीय बाजारावरही परिणाम होऊ शकतो.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टी सतत हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन बनवत आहे. बाजारासाठी हे चांगले संकेत आहेत. आता निफ्टीचा सपोर्ट 18450 वरून 18550 वर गेला आहे. जोपर्यंत निफ्टी या सपोर्टच्या वर राहिल तोपर्यंत अपट्रेंडची शक्यता असेल आणि निफ्टी 18750-18800 या पातळीला स्पर्श करताना दिसेल.

बाजारात सकारात्मक अंडरटोन कायम असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. यात इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या मोठ्या कंपन्यांमधील रोटेशनल खरेदीचे योगदान महत्त्वाचे आहे. दुसरीकडे 18700 च्या जवळ निफ्टीसाठी तयार झालेले मिश्र जागतिक संकेत आणि प्रतिकार यामुळे बाजाराची तेजी मर्यादित राहू शकते असेही त्यांचे म्हणणे आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
सिप्ला (CIPLA)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
सनफार्मा (SUNPHARMA)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
ट्रेंट (TRENT)
एमआरएफ (MRF)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)
पर्सिस्टंट (PERSISTENT)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT