Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

येत्या काळात देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत अस्थिरता सुरू राहू शकते असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शिल्पा गुजर

सोमवारी बाजार घसरणीसह बंद झाला. RBI मॉनेटरी पॉलिसी कमिटीची तीन दिवसीय बैठक सोमवारपासून सुरू झाल्याने गुंतवणूकदार सावध दिसले. याशिवाय आशियाई बाजारातून येणारे संमिश्र संकेत, कच्च्या तेलाच्या किमती आणि कोविड प्रकरणांमध्ये झालेली वाढ यामुळेही सोमवारी दबाव दिसून आला. शेवटी सेन्सेक्स 93.91 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 55,675.32 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 14.75 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 16,569.55 वर बंद झाला.

येत्या काळात देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत अस्थिरता सुरू राहू शकते असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 8 जून रोजी येणार्‍या RBI MPC च्या निर्णयांवर बाजाराचे लक्ष आहे. ECB ची बैठक दुसऱ्या दिवशी म्हणजेच 09 तारखेला होणार आहे. त्यानंतर, 10 जून रोजी, यूएस चलनवाढीचा डेटा येईल, ज्यावर बाजाराची नजर असेल.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

क्रेडिट पॉलिसी जाहीर होण्यापूर्वी बाजार सावध दिसत असल्याचे कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे श्रीकांत चौहान म्हणाले. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार रिअल्टीसारख्या व्याज-संवेदनशील शेअर्समधून बाहेर पडताना दिसत आहेत. तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, निफ्टीला 16450 च्या जवळ सपोर्ट मिळत असल्याचे दिसून आले पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. डे ट्रेडर्ससाठी 16500 लेव्हल खूप महत्त्वाची आहे. निफ्टी त्याच्या वर गेला तर 16650-16750 ची पातळी दिसू शकते. दुसरीकडे, जर निफ्टी खाली घसरला तर तो 16,400-16,350 च्या आसपास जाताना पाहू शकतो.

सोमवारी बाजार मंदावला होता आणि मिश्र जागतिक संकेतांमुळे तो जवळजवळ सपाट बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि MPC बैठकीपूर्वी सावधगिरीचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. इंडेक्समध्ये पुढे कंसोलिडेशनचे संकेत दिसत आहेत.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज ऑटो (BAJAJAUTO)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

ओएनजीसी (ONGC)

अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

ए यू बँक (AUBANK)

टाटा पॉवर (TATAPOWER)

भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवन हंस हेलिकॉप्टर ७ जणांसह समुद्रात कोसळलं, हेलिपॅड फक्त ३०० मीटरवर होतं; काय घडलं?

British Airways Boeing 787 Emergency Landing in Nagpur : लंडनहून निघालेलं विमान अचानक नागपुरात! 169 प्रवाशांचा जीव टांगणीला; पहाटे 5:30 वाजता नेमकं काय घडलं?

Share Market fraud: जादा नफ्याच्या आमिषाने घातला ४३ लाखांना गंडा; शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा; आयपीओमधून ऑनलाइन फसवणूक!

२ महिन्यांपूर्वी संपली मालिका! पुन्हा येतेय गिरीजा आणि मंदारची जोडी; अभिनेत्याने स्वतः दिली गुड न्यूज

Latest Marathi News Live Update : राजूर ते अहिल्यानगर १४८ किमी पायी लाँगमार्चला सुरुवात; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ‘लाल वादळ’ मार्गस्थ

SCROLL FOR NEXT