

Supriya Sule on NCP Merger Says No Proposal or Discussion After Ajit Pawar Death Puts Merger Speculation to Rest
sakal
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला. ‘माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपला,’ असे भावनिक विधान करत त्यांनी यासंदर्भातील सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपल्याकडे विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि यावर कोणाशीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.