Share market pre analysis  Sakal
अर्थविश्व

Share Market: बाजारात 2 दिवसांपासून तेजीचे वातावरण; आज कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?

गुरूवारी बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. हेवी वेट शेअर्ससोबतच सगळ्याच शेअर्स मध्ये गुरूवारी खरेदी दिसून आल्याने हा तेजीचा माहौल होता.

शिल्पा गुजर

Share Markte: गुरूवारी बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. हेवी वेट शेअर्ससोबतच सगळ्याच शेअर्स मध्ये गुरूवारी खरेदी दिसून आल्याने हा तेजीचा माहौल होता. दिवसा अंती सेन्सेक्स 874.18 अंकांनी अर्थात 1.53 टक्क्यांनी वाढून 57,911.68 वर बंद झाला. तर निफ्टी 256.05 अंकांनी म्हणजेच 1.49 टक्क्यांनी वाढून 17,392.60 वर बंद झाला.

बऱ्याच काळानंतर बाजारात बुल्सचे कमबॅक दिसून आल्याचे एलकेपी सिक्युरिटिजचे के एस रंगनाथन यांनी म्हटले. एनर्जी सेक्टरने बाजाराला चांगली साथ दिली. ग्रॉस आणि रिफायनिंग मार्केटमध्ये चांगली वाढ दिसून येण्याची आशा असल्याचेही ते म्हणाले. ऑटो सेक्टरसह सगळे सेक्टरल इंडेक्स हिरव्या चिन्हात बंद झाले.

आज बाजार कसा असेल ?

दमदार जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटिजचे श्रीकांत चौहान म्हणाले. सगळ्या सेक्टर्स मध्ये खरेदी दिसून आली. मजबूत ओपनिंगनंतर निफ्टी 200-day SMA च्या वर राहण्यात यशस्वी झाला. सोबतच त्याने डेली चार्टवर लाँग बुलीश कँडल तयार केली आहे जी बाजारात आगामी काळात तेजीचे संकेत देत आहे. ट्रेडर्ससाठी 17,500-17,550 वर रझिस्टंस दिसून येत आहे. तर 17,300-17,275 च्या खाली सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

आयशर मोटर्स (EICHERMOTORS)

कोल इंडिया (COALINDIA)

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

कोटक बँक (KOTAKBANK)

टाटा पॉवर (TATAPOWER)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

बाळकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

एमआरएफ (MRF)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT