Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

शिल्पा गुजर

Share Market Analysis: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. मेटल, आयटी, पॉवर, रिअॅल्टी आणि बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 503.27 अंकांच्या म्हणजेच 0.94 टक्क्यांच्या वाढीसह 54252.53 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 144.35 अंकांच्या म्हणजेच 0.90 टक्क्यांच्या वाढीसह 16,170.15 वर बंद झाला.

जोरदार विक्रीनंतर बाजार आता दबावातून सावरण्याची चिन्हे दिसू लागल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बाजारात शॉर्ट ते मीडियम टर्ममध्ये बाउन्सबॅक दिसू शकतो. तांत्रिक दृष्टीकोनातून, ब्रॉडर मार्केट ओवरसोल्ड आहे आणि व्हॅल्यूएशन 3-वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी आहे. बाजारातील करेक्शनचे प्रमुख कारण म्हणजे FII ची प्रचंड विक्री असल्याचे ते म्हणाले. तर देशांतर्गत खरेदीतही घट झाली आहे. बाजारात काही तेजी आल्यास एफआयआयची विक्री थांबवण्यात महत्त्वाचा हातभार लागेल. या दृष्टीकोनातून यूएस फेड आणि आरबीआयने जूनमध्ये घेतलेले निर्णय अतिशय महत्त्वाचे ठरतील.महागाई रोखण्यासाठी भारत सरकारने घेतलेले आर्थिक निर्णय देशांतर्गत बाजारासाठी सकारात्मक आहेत, असेही ते म्हणाले.

आज बाजाराची स्थिती कशी असेल?

बाजारात प्रचंड अस्थिरता असेल, हे लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज असल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम यांनी सांगितले. यूएस फेड आणि आरबीआयचे जूनमधील निर्णय शॉर्ट टर्ममध्ये बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असेही ते म्हणाले. निफ्टीला 16000 वर सपोर्ट तर 16400 वर रझिस्टन्स दिसत आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 34500 वर सपोर्ट आणि 35500 वर रझिस्टन्स दिसत आहे.

गुरुवारी शेवटच्या तासात बाजारात चांगले शॉर्ट कव्हरिंग दिसले, ज्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी 3 दिवसांच्या घसरणीतून सावरत हिरव्या चिन्हात बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. यूएस FOMC चे मिनिट्स आलेत. बाजार आता संभाव्य दर वाढीसाठी सज्ज दिसत आहे. त्‍यामुळे एफएँडओ एक्‍स्पायरीच्‍या दिवशी जोरदार खरेदी झाली. उच्च चलनवाढीचा दर, सतत FII विक्री-ऑफ, यूएस-युक्रेन संघर्ष यामुळे आम्ही अधूनमधून विक्री दिसेल असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

टाटा स्टील (TATASTEEL)

अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

एचडीएफसी बँक (HDFCBANK)

ए यू बँक (AUBANK)

भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

एम फॅसिस (MPHASIS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT