Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

शेअर बाजार सुरु होण्यापुर्वी जाणून घेऊयात आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

शिल्पा गुजर

बुधवारी पुन्हा अस्थिरतेनंतर बाजार लाल चिन्हात अर्थात घसरणीसह बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये वाढ मंदावण्याची भीती यामुळे बाजारावर परिणाम झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 185.24 अंकांच्या अर्थात 0.33 टक्क्यांच्या वाढीसह 55,381.17 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 40.60 अंकांच्या म्हणजेच 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 16,543.95 वर बंद झाला.

युरोपियन युनियनच्या रशियन तेलावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे बाजारावर परिणाम झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष 22 मध्ये 8.7 टक्के वाढ नोंदवली पण आर्थिक वर्ष 2023 मध्ये ती 7.2 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, बांधकाम क्षेत्रातील वाढीच्या पार्श्‍वभूमीवर, वाहन उत्पादक कंपन्यांच्या आकडेवारीने प्रवासी आणि व्यावसायिक वाहन विभागांमध्ये आज ताकद दाखवली आहे. मात्र, दुचाकीसह ट्रॅक्टरच्या सेगमेंटवर ताण कायम आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सर्व मॅक्रो डेटा जाहीर झाल्यानंतर आता बाजाराची दिशा महागाईचा दर आणि जागतिक बाजारातून मिळणारे संकेत ठरवतील असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. आर्थिक धोरणापूर्वी मान्सूनचे अपडेट फोकसमध्ये असेल. या सगळ्यात बाजारातील दृष्टिकोन तेजीचा असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत, खरेदीचा सल्ला त्यांनी दिला आहे.

या महिन्यात RBI आणि US Fed या दोन्हींची बैठक होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सरकारने काही पावले उचलल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे मितुल शाह म्हणाले.

आता चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँका काय पावलं उचलतात याकडे बाजाराचे लक्ष असेल असेही ते म्हणाले. कच्च्या तेलाच्या किमतीतील बदल आणि आयात-निर्यात शुल्कातील सुधारणा ही बाजाराची दिशा ठरवण्यात मोठी भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, FII कडून सातत्याने होत असलेली विक्री आणि रुपयाचे सातत्याने होणारे अवमूल्यन यामुळे नजीकच्या काळात त्याचा आर्थिक परिणाम दिसून येईल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

कोल इंडिया (COAL INDIA)

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

कोटक बँक (KOTAKBANK)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

ऍस्ट्रल (ASTRAL)

ए यू बँक (AUBANK)

व्होल्टास (VOLATS)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Interview: शरद पवार अन् मी म्हणजे संताजी-धनाजी..., मोदींची औरंगजेबाशी तुलना करत ठाकरेंची टोलेबाजी

Mother's Day 2024 : आई आणि मुलांच्या शारिरीक अन् मानसिक विकासासाठी फायदेशीर योगासने, जाणून घ्या सरावाची योग्य पद्धत

Uddhav Thackeray: "मोदी आता गल्ली-बोळातही रोड शो करतील..." राज्यातील प्रचारसभांवरून ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

PM Modi: 'उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी...'; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update : किरीट सोमय्यांचा डीपफेक फोटो व्हायरल; तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT