petrol diesel
petrol diesel google
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे संकेत; तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतींचा परिणाम

नमिता धुरी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी चढउतार होत आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांवर इंधन दरवाढीचा दबाव येत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव प्रतिबॅरेल १२२ डॉलरवर पोहोचले. कच्चा तेलाच्या दरात वाढ होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेले कच्च्या तेलाचे दर पाहाता भारतात लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, सोमवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ९६.७२ रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८९.६२ रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०९.२७ रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर ९७.२८ रुपये एवढा आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल १०९.२७ रुपये आणि डिझेल प्रतिलिटर ९५.८४ रुपयांनी विकलं जातंय.

पुणे - पुण्यात आज पेट्रोलचा दर १११.२५ रुपये आहे.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९६.७२ आणि डिझेलचा दर ८९.६२ इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.०३ रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर ९२.७६ रुपये इतका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT