Share Market closing esakal
अर्थविश्व

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरू, सेन्सेक्स 208 अंकांनी घसरला

आठवड्यातील पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण

सकाळ डिजिटल टीम

आठवड्यातील पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 0.33 टक्क्यांची घसरण होऊन तो 62,068 अंकांवर सुरू झाला आहे. तर निफ्टीमध्ये 0.16 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,473 अंकांवर खुला झाला आहे. शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात 13 शेअर्स तेजीत दिसून येत आहेत तर 37 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

शुक्रवारी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. बँक निफ्टी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर घसरला. एफएमसीजी आणि फार्मा शेअर्समध्ये किंचित वाढ झाली, तर सर्वात मोठी घसरण आयटी शेअर्समध्ये दिसून आली. रियल्टी, मेटल शेअर्सवरही दबाव होता. निफ्टीच्या आयटी निर्देशांकात या आठवड्यात 6 टक्क्यांची घसरण झाली. निफ्टी रियल्टी निर्देशांक या आठवड्यात 3 टक्क्यांनी घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवरही दबाव दिसून आला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

शुक्रवारी बाजारात प्रॉफीट बुकींग दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. आता पुढील आठवड्यात व्याजदरांबाबत यूएस फेडच्या निर्णयाकडे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. चलनवाढ आणि व्याजदर यावर यूएस फेडचे भाष्य बाजारासाठी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

निफ्टी आणखी कमजोर होण्याची चिन्हे दिसत असल्याचे शेअरखानचे (Share Market) गौरव रत्नपारखी म्हणाले. शॉर्ट टर्ममध्ये, तो 18300-18650 च्या रेंजमध्ये कंसोलीडेशन दिसू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एचसीएल टेक (HCLTECH)

टेक महिन्द्रा (TECHM)

इन्फोसिस (INFY)

विप्रो (WIPRO)

टीसीएस (TCS)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

झिंदाल स्टील (JINDALSTEL)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT