Gudi Padwa Special Sugar-Free Dates Shrikhand: गुढी पाडव्याला मधुमेहीदेखील खाऊ शकतील श्रीखंड; खजूर श्रीखंडाची रेसिपी लगेच वाचा

Dates Shrikhand Recipe: गुढी पाडव्याला आरोग्यदायी शुगरफ्री खजूर श्रीखंड करून सणाचा आनंद घ्या!
Gudhi Padwa Special Khajoor Shrikhand
Gudhi Padwa Special Khajoor Shrikhandsakal
Updated on

Gudhi Padwa Khajoor Shrikhand: गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी सगळे मराठी बांधव आपल्या घराच्या दारात किंवा खिडकीत गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करतात. गुढी पाडव्याला खास गोडधोड खाण्याची परंपरा आहे. सगळ्यांकडे बऱ्यापैकी पुरणपोळी बनते, परंतु काही जण श्रीखंड देखील बनवतात. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींना मर्यादा पाळाव्या लागतात. पण चिंता करू नका! यंदाच्या गुढी पाडव्याला साखर न घालता तयार होणाऱ्या ‘खजूर श्रीखंडा’ची रेसिपी खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. हे श्रीखंड केवळ आरोग्यदायी नाही तर अत्यंत स्वादिष्टही आहे. चला तर मग, जाणून घेऊया शुगरफ्री खजूर श्रीखंडाची सोपी रेसिपी.

Gudhi Padwa Special Khajoor Shrikhand
Gudi Padwa 2025 Delicious Food Recipes: यावर्षी गुढी पाडव्याला बाजारातून न आणता घरीच बनवा साखरेच्या गाठी, लगेच नोट करा सोपी रेसिपी

साहित्य:

- ५०० ग्रॅम घट्ट दही

- १-२ मोठे चमचे खजूर पेस्ट

- १/४ चमचा वेलदोडे पूड

- थोडे दूध

Gudhi Padwa Special Khajoor Shrikhand
Healthy Kulfi Bites Recipe: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी बनवा 'हेल्दी कुल्फी बाइट्स', लगेच नोट करा रेसिपी

कृती:

  1. दही स्वच्छ मलमलच्या कपड्यात बांधून संपूर्ण रात्र फ्रीजमध्ये टांगून ठेवा. दुसऱ्या दिवशी निघालेलं पाणी फेकून द्या.

  2. आता हे दही एका भांड्यात काढा.

  3. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात खजूर आणि थोडे दूध घेऊन खजूराची पेस्ट तयार करा.

  4. आता दह्यात खजूर पेस्ट आणि वेलदोडे पूड घालून चांगले मिसळा व हलकेसर फेसाळेपर्यंत घुसळा.

  5. थंड करून पुरीसोबत सर्व्ह करा आणि गोडसर सणाचा आनंद घ्या!

हे श्रीखंड चविष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यंदाच्या गुढी पाडव्याला आरोग्याची काळजी घेत गोडधोडाचा आनंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com