paper stock will give super return
paper stock will give super return 
अर्थविश्व

'हा' पेपर स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये देईल चांगला परतावा...

शिल्पा गुजर

शेअर बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे, अशात दमदार फंडामेंटल्स असणारे शेअर्स तुम्ही खरेदी केले तर तुम्हाला येत्या काळात चांगला नफा मिळू शकतो. त्यामुळेच तुम्हाला या चढ-उताराच्या दरम्यान शेअर बाजारात खरेदी करायची असेल, तर तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी काही शेअर्स मते तुम्ही खरेदी करू शकता. यावेळी संदीप जैन यांनी स्टार पेपरची (Star Paper) निवड केली आहे. सध्या हा शेअर त्याच्या बूक व्हॅल्यूपेक्षा कमी किंमतीवर ट्रेड करत आहे आणि अशा वेळी या शेअरमध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते असे जैन यांचे म्हणणे आहे.

  • स्टार पेपर (Star Paper)

  • सीएमपी (CMP) - 154.70 रुपये

  • टारगेट (Target) - 175/190 रुपये

या स्टॉकमध्ये खरेदी का करावी ?

स्टार पेपर (Star Paper) ही कंपनी खूप जुनी आहे, ही कंपनी 1936 पासून कार्यरत आहे. तज्ज्ञांच्या मते, पेपर स्टॉकने गेल्या दोन-तीन दिवसांत चांगली कामगिरी केली आहे. कंपनी अडीच टक्के डिव्हीडेंड यील्ड देते.

कंपनीचे तिमाही निकाल ?

मार्च 2022 मध्ये कंपनीने 18 कोटी रुपयांचा नफा सादर केला. कोरोनापूर्वी ही कंपनी वार्षिक 50-60 कोटी रुपये कमावत होती पण कोविडच्या काळात पेपर स्टॉक्सवर परिणाम झाला आणि आता कंपनीला 30-40 कोटी रुपयांचा नफा होतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : हनुमानाची भूमी काँग्रेसला माफ करणार नाही- पीएम मोदी

SCROLL FOR NEXT