Corona insurance
Corona insurance Sakal
अर्थविश्व

स्मार्ट नियोजन : कोरोना महासाथीच्या काळात विमा संरक्षणाला हवे प्राधान्य!

सुधाकर कुलकर्णी

गेली दोन वर्षे आपण सर्व जण कोरोना महासाथीच्या छायेत वावरत आहोत. परिणामी, आपल्या दिनचर्येत काही आमूलाग्र बदल झाले आहेत व ते आपण आता (‘न्यू नॉर्मल’ म्हणत) स्वीकारलेही आहेत.

गेली दोन वर्षे आपण सर्व जण कोरोना महासाथीच्या छायेत वावरत आहोत. परिणामी, आपल्या दिनचर्येत काही आमूलाग्र बदल झाले आहेत व ते आपण आता (‘न्यू नॉर्मल’ म्हणत) स्वीकारलेही आहेत. असे असले तरी कोरोनाच्या महासाथीमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक समस्या मात्र अजूनही तशाच आहेत व त्यासाठी आवश्यक ते आर्थिक नियोजन करणे अजूनही गरजेचे आहे. काय आहेत या आर्थिक समस्या व त्यांसाठी नेमके कसे नियोजन करायला हवे, हे आज थोडक्यात पाहू.

1) कोरोनाबाधित होऊन अकाली मृत्यू ही एक गंभीर समस्या आहे आणि जर अशी व्यक्ती कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असेल, तर समस्या खूपच गंभीर होऊन जाते. यातून उद्भवणाऱ्या आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी कमावत्या प्रत्येक व्यक्तीने पुरसे आयुर्विमा संरक्षण (इन्शुरन्स कव्हर) असणारी (आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १२ ते १५ पट) आयुर्विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे व यासाठी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेऊन आपल्या पश्चात आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद करता येते.

2) एखादी व्यक्ती कोरोनामुळे आजारी पडल्यास सुमारे महिना-दीड महिना आपले दैनंदिन कामकाज करू शकत नाही आणि जर अशी व्यक्ती स्वयंरोजगारीत असेल (उदा. रिक्षाचालक, हातगाडीवाला आदी) तर दैनंदिन कामकाज बंद राहिल्याने या काळातील उत्पन्न तर मिळत नाहीच; शिवाय हॉस्पिटलायझेशन, औषधे व अनुषंगिक खर्च मात्र करावा लागतो. परिणामी, आर्थिक समस्या उभी राहते. विशेषत: ज्यांचे हातावरचे पोट असते, त्यांच्यासाठी ही गंभीर आर्थिक समस्या होऊन बसते. अशा व्यक्तींनी ‘कोरोना रक्षक’ ही पॉलिसी घेणे गरजेचे आहे. ही पॉलिसी किमान रु. ५०,००० व कमाल रु. २,५०,००० इतक्या कव्हरची घेता येते. यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीस पॉलिसीतील इन्शुरन्स कव्हरची संपूर्ण रक्कम क्लेमपोटी मिळते. मात्र, यासाठी कोरोनाबाधित व्यक्ती किमान ७२ तास हॉस्पिटलाइज्ड असणे आवश्यक असते.

3) कोरोनाबाधित व्यक्तीकडे ‘कोरोना कवच’ पॉलिसी असल्यास जास्तीतजास्त इन्शुरन्स कव्हरच्या रकमेइतका किंवा प्रत्यक्ष खर्च यातील कमीतकमी इतका हॉस्पिटलायझेशन, औषधे व अनुषंगिक खर्च या पोटीचा क्लेम मिळू शकतो. ही पॉलिसी किमान रु. ५०,००० व कमाल रु. ५,००,००० इतक्या कव्हरची घेता येते.

थोडक्यात, कोरोना महासाथीच्या काळात प्रत्येकाने आपले आर्थिक नियोजन करताना आयुर्विमा आणि त्या बरोबरीने आरोग्य विमा संरक्षणाचा गांभीर्याने आणि प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे.

गुंतवणूक संधी

‘अदानी विल्मर’चा ‘आयपीओ’

  • प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) - २७ जानेवारी २०२२ पासून सुरू

  • पब्लिक इश्यूची शेवटची तारीख - सोमवार, ३१ जानेवारी २०२२

  • एक रुपया दर्शनी किंमत असलेल्या प्रतिशेअरचा किंमतपट्टा - रु. २१८ ते रु. २३०

  • बोली - किमान ६५ शेअरसाठी आणि त्यानंतर ६५ शेअरच्या पटीत

(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT