
समृद्धी महामार्गावर मुंबईतील सराफ व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे या लुटीत सराफ व्यापाऱ्याचा चालकही दरोडेखोरांना सामील होता. २२ ऑगस्टला मुंबईतील सराफ व्यापारी शेषमलजी जैन हे खामगाव इथं व्यापारासाठी आले होते. ते मुंबईला जात असताना मेहकर टोल नाक्याच्या पुढे कार थांबवून दरोडा टाकण्यात आला. कार चालकानं मला फ्रेश व्हायचंय म्हणत गाडी थांबवली आणि दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी डाव साधला. दरोडेखोरांसोबत चालकही पळून गेला आहे.