Taliban welcomes Indian Budget  esakal
अर्थविश्व

Budget 2023: भारतीय अर्थसंकल्पाची तालिबानला भुरळ

दोन्ही देशांमधील संबंध आणि विश्वास सुधारण्यास मदत

रुपेश नामदास

तालिबानने गुरुवारी भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023-2024 चे स्वागत केले आणि सांगितले की भारताच्या अफगाणिस्तानला मदतीची घोषणा दोन्ही देशांमधील संबंध आणि विश्वास सुधारण्यास मदत करेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात अफगाणिस्तानसाठी $25 दशलक्ष विकास मदत पॅकेजचा प्रस्ताव दिल्यानंतर तालिबानने प्रतिक्रिया दिली आहे.

भारताने अफगाणिस्तानला 200 कोटी रुपयांची विकास मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर भारताच्या पाठिंब्याचे हे दुसरे वर्ष आहे.

'खामा प्रेसच्या वृत्तानुसार' गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही सुरुवातीची घोषणा करण्यात आली होती.

भारताच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना, तालिबानच्या वाटाघाटी करणार्‍या टीमचे माजी सदस्य सुहेल शाहीन म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारताच्या समर्थनाचे स्वागत करतो. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणि विश्वास सुधारण्यास मदत होईल.

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने काबूलमध्ये सत्ता काबीज केली तेव्हा अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आणि भारताने दिलेली बहुतांश मदत थांबवण्यात आली.

याबाबत शाहीनने सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये असे अनेक प्रकल्प आहेत, ज्यांना भारत निधी देत ​​आहे. भारताने या प्रकल्पांवर पुन्हा काम सुरू केल्यास दोन्ही देशांमधील संबंध वाढतील आणि विश्वास प्रस्थापीत होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT