Tata IT company earns 8118 crore
Tata IT company earns 8118 crore  
अर्थविश्व

टाटांच्या 'या' आयटी कंपनीने कमावले 8,118 कोटी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील आघाडीच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीला डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 8 हजार 118 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 0.2 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. 

चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीशी तुलना करता टीसीएसच्या नफ्यात 0.94 टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. कंपनीने 39 हजार 854 कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 6.7 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 40 हजार 672 कोटी रुपयांवर पोचले आहे. टीसीएसचे "अर्निंग पर शेअर' (ईपीएस) 0.13 टक्‍क्‍यांनी वाढून 21.63 रुपयांवर पोचले आहे. कंपनीने समभागधारकांना प्रतिसमभाग 5 रुपये लाभांश जाहीर केला आहे. लाभांशासाठी 25 जानेवारी ही "रेकॉर्ड डेट' निश्‍चित करण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात दिवसअखेर टीसीएसचा समभाग 20 रुपयांच्या घसरणीसह 2 हजार 218 रुपयांवर व्यवहार करीत बंद झाला. 

मोठ्या प्रमाणात आलेल्या कामांमुळे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानविषयक सोल्युशन्स ग्राहकांना पुरवण्यासंदर्भातील आमची क्षमता अधोरेखित होते. यामुळे ग्राहकांबरोबरचे आमचे संबंध अधिक दृढ होत आहेत आणि व्यवसायाला अधिक स्थिरता येते आहे. 
- राजेश गोपीनाथन, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, टीसीएस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; पोलीस ॲक्शन मोडवर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT