tata group sakal
अर्थविश्व

TATA, Amazon आणि Reliance ला देणार दक्कर! कंपनी नवीन IPO आणण्याची तयारीत; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

TATA Groups IPO : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी काळात टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांचे IPO (IPO1) बाजारात दाखल होऊ शकतात. टाटा समूह ऑनलाइन बिगबास्केट कंपनीचा आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची बातमी आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 2025 पर्यंत ऑनलाइन बिगबास्केटचे शेअर बाजारात लिस्ट केले जाऊ शकतात. टाटा समूहाची ऑनलाइन बिगबास्केट किराणा कंपनी तीन वर्षांच्या आत शेअर्सची यादी करेल, असे ब्लूमबर्गने बुधवारी सांगितले.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

एका मुलाखतीत, बिगबास्केटचे मुख्य वित्तीय अधिकारी विपुल पारेख म्हणाले की, बेंगळुरू-मुख्यालय असलेली ई-कॉमर्स कंपनी पुढील 24 ते 36 महिन्यांत IPO लाँच करेल. याआधी, कंपनी खाजगी निधी उभारण्याचा विचार करत आहे. बिगबास्केटने विविध खाजगी फंड कंपन्यांद्वारे सुमारे 200 डॉलर दशलक्ष जमा केले आहेत.

काय आहे कंपनीची योजना?

कंपनी सध्या निधी उभारण्याच्या प्रक्रियेत आहे आणि भारतभर आपला व्यवसाय विस्तारण्याची योजना आखत आहे. यामुळे अॅमेझॉन आणि रिलायन्स इंडस्ट्री सोबत तगडी स्पर्धा होऊ शकते. पारेख यांच्या मते, बिगबास्केटचा पुरवठा करणाऱ्या डार्क स्टोअर्सची संख्या वाढवेल. कंपनी मार्चपर्यंत सुमारे 200 ते 300 आउटलेट उघडण्याचा विचार करत आहे.

पारेख म्हणाले की बिगबास्केट सध्या 55 शहरांमध्ये कार्यरत आहे आणि 75 शहरांमध्ये विस्तार करण्याचा विचार करत आहे. कंपनीचे स्टोअर सुमारे 450 शहरांमध्ये आहेत आणि पुढील वर्षी आणखीन 80 ते 100 शहरांमध्ये स्टोअर वाढू शकते, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT