Raj Thackeray : छठ पूजेच्या गाण्यांवरून राज ठाकरे आक्रमक; भाजपला दिला थेट इशारा, म्हणाले, 'हा महाराष्ट्र आहे, इथे मरहट्टे राहतात!'

Chhath Puja : भाजप उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी महाराष्ट्रात फोडा-आणि-राज्य-कराची रणनीती वापरत असल्याचा आरोप केला. राज ठाकरे यांनी मराठी जनतेला भाजपच्या संघर्षाच्या राजकारणात अडकू नये आणि सतर्क राहावे असे आवाहन केले.
Raj Thackeray : छठ पूजेच्या गाण्यांवरून राज ठाकरे आक्रमक; भाजपला दिला थेट इशारा, म्हणाले, 'हा महाराष्ट्र आहे, इथे मरहट्टे राहतात!'
Updated on: 

मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर छठ पूजेची आणि भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याने राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. रेल्वेच्या या निर्णयावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत भोजपुरी गाणी वाजवण्यास विरोध केला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या मुद्द्यावर भाष्य करत राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'हा महाराष्ट्र आहे, इथे मरहट्टे राहतात', अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...