करदात्यांना पुन्हा दिलासा? ITR दाखल करण्याची अंतिम मुदत वाढू शकते esakal
अर्थविश्व

करदात्यांना पुन्हा दिलासा? ITR दाखल करण्याची अंतिम मुदत वाढू शकते

करदात्यांना पुन्हा दिलासा? ITR दाखल करण्याची अंतिम मुदत वाढू शकते

सकाळ वृत्तसेवा

2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

जर सर्व काही ठीक असेल, तर पुन्हा एकदा इन्कम टॅक्‍स रिटर्न (Income Tax Return - ITR) भरण्याची अंतिम मुदत वाढवली जाऊ शकते. खरेतर, आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत या वर्षी आयकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांची संख्या कमी आहे. 15 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 3.59 कोटी पेक्षा जास्त ITR दाखल करण्यात आले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, दररोज 6 लाखांहून अधिक ITR दाखल केले जात आहेत आणि हे वाढत देखील आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 5.95 कोटींपेक्षा जास्त ITR दाखल करण्यात आले होते. मात्र, 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 12 जानेवारीपर्यंत संधी होती. (The deadline for filing income tax returns may be extended)

तथापि, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी 2.36 कोटी ITR दाखल करणे बाकी आहे आणि 31 डिसेंबर 2021 ही अंतिम मुदत संपण्यासाठी 13 दिवस शिल्लक आहेत. यामुळेच आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवणे अपेक्षित आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. आधीच ही मुदत दोनदा म्हणजे 31 जुलै व त्यानंतर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती.

यावेळी उशीर होण्याचे कारण म्हणजे 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्यासाठी एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आले. देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) हे पोर्टल तयार केले आहे. मात्र, पोर्टलमधील अडचणींमुळे अनेक दिवस आयटीआर फाइलिंगमध्ये अडथळे येत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT