Zomato Shares esakal
अर्थविश्व

Zomato Shares : झोमॅटोचे शेअर्स घ्यायची 'ही' आहे योग्य वेळ?

झोमॅटोचा स्टॉक विक्रमी नीचांकी पातळीवर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

झोमॅटोचा स्टॉक विक्रमी नीचांकी पातळीवर आला आहे.

झोमॅटोचा (Zomato) स्टॉक विक्रमी नीचांकी पातळीवर आला आहे. या शेअरनं 52 आठवड्यातील सर्वकालीन नीचांकी (All Time Low) 41.25 रुपयांवर आला आहे. खरं तर, प्री-ऑफर इक्विटी शेअर भांडवलावर एक वर्षाचा लॉक-इन 23 जुलै 2022 रोजी संपला. तेव्हापासून शेअरमध्ये जोरदार विक्री झाली. स्टॉक त्याच्या विक्रमी उच्चांकावरून जवळपास 76 टक्क्यांनी घसरला आहे.

असं असूनही, जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीज या स्टॉकबाबत पॉझिटीव्ह आहे. जेफरीजने Zomato स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, टारगेट 100 रुपये ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे, स्टॉकमध्ये सुमारे 144 टक्क्यांची मजबूत वाढ दिसू शकते.

जेफरीज झोमॅटोबाबत पॉझिटीव्ह कसे?

झोमॅटोबाबत ब्रोकरेज फर्म जेफरीज म्हणणे आहे की, हा सूर्योदयाआधीचा अंधार आहे. जगभरातील फेडच्या कडकपणामुळे आणि कॅशफ्लोवर गुंतवणूकदारांचे लक्ष यामुळे फूड टेकसह इंटरनेट कंपन्या रडारवर आहेत. गेल्या वर्षी झोमॅटोच्या लिस्टच्या वेळी जो उत्साह होता, तो आता थंडावला आहे. ब्लिंकिटच्या अधिग्रहणाचा फायदा होऊ शकतो, त्यामुळेच जेफरीजचा असा विश्वास आहे की, लाँग टर्म गुंतवणूकदार झोमॅटो स्टॉक खरेदी करू शकतात.

सध्याचा विचार केल्यास हा शेअर वरच्या लेव्हलवर 160 रुपये आणि डाउनसाइडवर 40 रुपयांची पातळी गाठू शकतो. जेफरीजच्या मते, झोमॅटोच्या शेअरच्या (Zomato Shares) किमतीत सुधारणा झाल्यानंतर, स्टॉक 0.9x 1Y फॉरवर्ड EV/GMV आणि 3.5x EV/Revenue वर ट्रेडिंग करत आहे. FY22-25E मध्ये 30 टक्के मजबूत GAGR असूनही, फूड डिलिवरीमध्ये सतत नफा अपेक्षित आहे.

झोमॅटोच्या विक्रीची कारणं

झोमॅटोच्या बाबतीत, प्री-ऑफर इक्विटी शेअर भांडवलावर एक वर्षाचा लॉक-इन 23 जुलै 2022 रोजी संपला. कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर्स कॅटेगरी शून्य टक्के आहे असा नियम आहे. म्हणजेच प्रमोटर्स कॅटेगरीत त्यांचे कोणतेही भागधारक नाहीत. यामध्ये, आयपीओपूर्वी जे काही इक्विटी शेअर कॅपिटल असेल, ते अलॉटमेंट तारखेपासून एक वर्षाच्या लॉक-इन कालावधीमध्ये जाते. याचा अर्थ, प्री-इश्यू भाग भांडवल जे काही होते, ते एका वर्षासाठी भागधारक विकू शकत नाहीत. पण, यामध्ये काही सूट आहे, ज्यामध्ये कंपनीने आपल्या RHP मध्ये असे लिहिले आहे की इन-हाउस भागधारकांना सूट देण्यात आली आहे.

शेअर्स किंमतीत 76 टक्के घसरण

झोमॅटोचे शेअर्स 23 जुलै 2021 रोजी बाजारात लिस्ट झाले. IPO ची इश्यू किंमत 76 रुपये होती, तर ती 115 वर लिस्ट झाली. त्याच वेळी, लिस्टिंगच्या दिवशी, तो 66 टक्के प्रीमियमसह 126 रुपयांवर बंद झाला. लिस्टींगनंतर, 16 नोव्हेंबर 2021 रोजी स्टॉकने 169 रुपयांच्या विक्रमी उच्चांक गाठला. मात्र, त्यानंतर त्यात सुधारणा करेक्शन झाले. 26 जुलै 2022 च्या सत्रात, स्टॉक 41 रुपयांवर आला. या वर्षी आतापर्यंत साठा 71 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे आता हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज हाऊस जेफरीज देत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT