Stock Market Recommendation Sakal
अर्थविश्व

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर देईल तुम्हाला तगडा परतावा...

वार्षिक आधारावर या कंपनीच्या नेट सेल्समध्ये 54 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सरकारी मायनिंग नॅशनल ऍल्युमिनिअम कंपनी लिमिटेडचे (Nalco) शेअर्स येत्या काळात चांगली कमाई करतील असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मोतीराम ओसवाल (Motilal Oswal) आणि ऍक्सिस सिक्युरिटीज (Axis Securities) दोघेही या शेअरबाबत बुलिश आहेत. कंपनीचा एबिटडा अंदाजापेक्षा चांगला राहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कंपनीला यात चांगला नफा झालाय, शिवाय उत्पन्नातही वाढ झाली आहे.

नाल्को शेअर्समध्ये तेजी येणार

ग्‍लोबल ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने नाल्कोचे (Nalco) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 110 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या नेट सेल्समध्ये 54 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीला दोन कोळसा खाणी उत्कल डी आणि ई देण्यात आल्या आहेत. 2024 पासून नाल्को (Nalco) खाणकाम सुरु करु शकते असा अंदाज आहे, ज्यामुळे प्रॉडक्शन चांगले होईल. चीनकडून चांगला पुरवठा होतो आहे.

ऍल्युमिनिअमच्या किमती सध्याच्या पातळीच्या वर राहतील अशी अपेक्षा आहे.तर, चीनमधील अनेक ऍल्युमिनियम कंपन्या उत्पादन पुन्हा सुरू करत आहेत, ज्यामुळे करेक्‍शन थांबेल. ब्रोकरेजने ऍल्युमिनियम उत्पादनाच्या अंदाजात 3 टक्क्यांनी कपात केली आहे. तसेच, 4x FY23E EV/EBITDA मूल्यांकनावर 110 रुपयांचे टारगेट दिले आहे. सध्या नाल्कोचे शेअर्स 93 रुपयांवर ट्रेड करत आहेत. त्यामुळे आता जरी हे शेअर्स घेतले तरी येत्या काळात नफा होऊ शकतो असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

चौथ्या तिमाहीचे निकाल

नाल्‍कोचा मार्च 2022 तिमाही दरम्यान कंसॉलिडेटेड प्रॉफिट 9.5 टक्क्यांनी वाढून 1,025.46 कोटी झाला आहे. मार्च 2021 तिमाही दरम्यान नफा 935.74 कोटी होता. 2022 च्या चौथ्या तिमाहीत कंसॉलिडेटेड उत्पन्न वाढून 4,492.10 कोटी झाले होते, जी एका वर्षाआधी याच तिमाहीत 2,874.47 कोटी होते.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांची नाल्कोमध्ये 1.4 टक्क्यांची (25,000,000 इक्विटी शेअर्स) भागीदारी आहे. ट्रेंडलाइननुसार राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये 34 शेअर्स आहेत, ज्यांची नेटवर्थ 33,753.9 कोटींच्या आसपास आहेत. यात टेक, फायनान्स, रिटेल आणि फार्मा शेअर्सचा समावेश आहे. अनेक रिटेल गुंतवणुकदारांची झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओवर नजर असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT