Thomas Cook India announces partnership with Marathi superstar Subodh Bhave
Thomas Cook India announces partnership with Marathi superstar Subodh Bhave 
अर्थविश्व

Video सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय?

सकाळ डिजिटल टीम

पुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे. महाराष्ट्रीयन नागरिकांचा पर्यटनाकडे वाढता कल लक्षात घेऊन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांची सहल 'अविस्मरणीय' होण्याच्या उद्देशाने सुबोध भावे हे 18 आणि 19 मे दरम्यान यूरोपीय सहलींवर असणाऱ्या पर्यटकांशी संवाद साधणार आहेत. थॉमस कुक इंडियाच्या हॉलिडेज, एमआयसीई आणि व्हिसा विभागाचे अध्यक्ष आणि कंट्री हेड राजीव काळे यांनी ही माहिती दिली. ते आज पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

थॉमस कुक इंडियाने अविस्मरणीय युरोप ही सहल आयोजित केली आहे. या सहलीदरम्यान रु-ब-रु या खास कार्यक्रमात सुबोध भावे यांच्या सोबत संवाद साधण्याची संधी पर्यटकांना लाभणार आहे. यावेळी बोलताना भावे म्हणाले, "दमदार वारसा जपणाऱ्या आणि भारतीय पर्यटकांसाठी आपुलकीची टूर्स ऑपरेटर असणाऱ्या थॉमस कुक इंडियासोबत जोडले जाणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. युरोप टूरदरम्यान माझ्या चाहत्यांशी संवाद साधण्यास मी उत्सुक आहे आणि त्यांच्यासाठी हा अनुभव संस्मरणीय व्हावा, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे."

महाराष्ट्रीय पर्यटकांकडून कंपनीच्या सहलींना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून महाराष्ट्र विभागातून पर्यटनामध्ये 27 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले. प्रामुख्याने पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर इत्यादी शहरांमधील पर्यटकांच्या पसंतीस कंपनी उतरली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कंपनीच्या 'अविस्मरणीय' सहलींना मिळालेल्या प्रतिसादानंतर युरोप केंद्रित 'आकर्षक' आणि 'अतुलनीय' या दोन नव्या टूर्स आणल्या असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रीय पर्यटकांची आवड निवड लक्षात घेऊन मराठी खाद्यपदार्थ, मराठी भाषक टूर्स मॅनेजर्स यांसारख्या सुविधांवर कंपनीने विशेष लक्ष दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT