अर्थविश्व

टेन्शन नॉट! UPI, IMPS बँक ट्रान्सफर फेल झालं? असं मिळवा रिफंड

सकाळन्यूजनेटवर्क

एक एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली होती त्यामुळे बँकेला सुट्टी होती. तर दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडे असल्यामुळे बँकाची दारं बंद होती. त्यानंतर शनिवार आणि रविवार असल्यामुळे ग्राहकांनी बँकेकडे जाणं टाळलं. या कालावधीत अनेकांनी आर्थिक व्यावहारासाठी UPI आणि IMPS यांच्याकडे आपला मोर्चा वळवला होता. पण नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्या मते आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला काही बँकाचे UPI, IMPS ट्रान्जेक्शन फेल झाले आहेत. NPCI ने शुक्रवारी ट्विट करत संबदित बँकांची सिस्टम नॉर्मल झाली असून ग्राहक आयएमपीएस आणि यूपीआय सर्विसचा वापर करु शकतो, असं सांगितलं आहे.  एनपीसीआयच्या या ट्विटला अनेकांनी फेल ट्रान्जक्शनचे पैसे दोन दिवसानंतरही खात्यात न आल्याची तक्रार केली आहे. हे पैसे परत कसे मिळवावेत याबाबत जाणून घेऊयात...

कसं मिळेल रिफंड? 
NEFT, RTGS आणइ UPI द्वारे केलेवे व्यवहार फेल झाल्यानंतर किती दिवसानंतर रकम माघारी मिळे? असा प्रश्न प्रत्येक सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत. आरबीआय म्हणजे भारतीय रिजर्व्ह बँकेनं रिफंडबाबत १९ सप्टेंबर २०१९ मध्ये एक सर्कुलर जारी केलं होतं. त्यानुसार, जर एखाद्या ग्राहकाच्या खात्यात निर्धारित वेळेत पैसे माघारी आले नाहीत. तर बँकेला दंड म्हणून  ग्राकांना प्रतिदिवस १०० रुपये द्यावे लागतील. 

आरबीआयचं सर्कुलर आहे कसं?
सर्कुलरनुसार,  IMPS आणि UPI ट्रान्जक्शन फेल झाल्यास ग्राहकांच्या खात्यात ठरावीक कालावधीत (२४ तासांत) पैसे माघारी आले पाहिजेत.  जर बँक असं करत नसेल तर प्रति दिवस १०० रुपयांच्या दंडाला पात्र ठरते. 

Ombudsman करा संपर्क -

ट्रान्जक्शन फेल झाल्यास अन् ठरावीक कालावधीत पैसै माघारी मिळाले नाहीत. यासाठी बँकेशीही संपर्क केला तरीही पैसे माघारी मिळाले नाहीत. तर तुम्ही आरबीआयच्या Ombudsman कडे तक्रार नोंदवू शकता. तुम्ही https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/AAOOSDT31012019.pdf  या लिंकद्वारे तुमच्या भागातील Ombudsman सोबत संपर्क साधू शकता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT