अर्थविश्व

PAN-आधारशी लिंक झालं की नाही? असं तपासा स्टेटस  

सकाळन्यूजनेटवर्क

पॅनकार्ड हे आधार कार्डशी लिंक करणं देशभरातील नागरिकांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे. जर तुम्ही अजूनही तुमचं पॅनकार्ड (Permanent Account Number) तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक केलं नसेल, तर ते लवकर लिंक करून घ्या. इन्कम टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अद्याप आधार लिंक केलं नसेल तर तुमच्याकडून दंडही आकारण्यात येणार आहे. केंद्र सरकारने अनेकवेळा पॅनकार्ड आधारशी जोडण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता मुदतवाढ मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. अनेकांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेलं असेल, पण ते झालं की नाही हे तपासून पाहण्याची प्रक्रिया माहित नसेल. तर जाणून घेऊयात PAN-आधारशी लिंक झालं की नाही? कसं तपासायचं..

यासाठी सर्वात आधी आयकर विभागाच्या (इनकम टॅक्स) संकेतस्थळावर जा. https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html  ही लिंक उघडल्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स दिसतील. यामध्ये पॅन आणि आधार संदर्भातील सर्व माहिती भरा. त्यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटस वर क्लिक करा. या प्रक्रियेनंतर आधार पॅन लिंक असेल तर सक्सेस असा मॅसेज येआल. जर आधार-पॅनशी लिंक नसेल तर तसं स्टेट्स तुम्हाला दिसेल. यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही.... जर तुमचं आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक नसेल तुम्ही पुन्हा प्रयत्न करु शकता. (अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा)

पॅन आधार असं करा लिंक

पहिली पद्धत

- सर्वप्रथम ई-फायलिंगच्या वेबसाईटवर जा. 
- त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे, तसं नाव, पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्डचा नंबर भरा. 
- जन्मतारखेचा उल्लेख असेल तर स्क्वॉयर टिक करा. 
- त्याठिकाणी आलेला कॅप्च कोड भरा. आणि ओटीपीसाठीची रिक्वेस्ट पाठवा. तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. 
- आधार लिंक पर्याय निवडा. 

दुसरी पद्धत
- UIDPAN १२ अंकी आधार क्रमांक लिहा.
- त्याखाली १० अंकी पॅन कार्ड नंबर लिहा.
- हा मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ वर पाठवा. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT