Nirmala Sitharaman Budget 2022-23 Sakal
अर्थविश्व

Budget 2023 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशनावर 'महिला'राज

भारताच्या इतिहासामध्ये ही गोष्ट पहिल्यांदाच होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2022-23: यंदाचा देशाचा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी कोणत्या घोषणा होणार, याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण आणखी एका कारणासाठी हा अर्थसंकल्प चर्चेत आहे.

स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात करणाऱ्या राष्ट्रपतीही महिला आहेत आणि अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्रीही महिलाच आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात केली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन ज्या हा अर्थसंकल्प मांडत आहे, अशा दोन्हीही महिला असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या केंद्रीय अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. १९७०-७१ मध्ये मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर अर्थ मंत्रालयाचा कारभार इंदिरा गांधींनी स्वतः.च्या ताब्यात घेतला होता. २०१९ मध्ये निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प मांडणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या.

ब्राऊन रंगाची ब्रीफकेस घेऊन अर्थसंकल्प मांडण्याच्या प्रथेला छेद देत त्यांनी पांढऱ्या कपड्याच बॅगेप्रमाणे गुंडाळलेल्या स्वरुपात अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडण्याचं हे त्यांचं दुसरं वर्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT