mobile
mobile 
अर्थविश्व

चिनी बहिष्कृत, तरी 18 दिवसांत 10 लाख फोनविक्री

वृत्तसंस्था

अहमदाबाद / बीजिंग : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शविणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी गुजरात चेंबरच्या वाणिज्य आणि उद्योग संघाने (जीसीसीआय) चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.  मात्र, दुसरीकडे शाओमी या चीनमधील मोबाईल कंपनीने भारतात या महिन्यातील 18 दिवसांत दहा लाख स्मार्टफोन विकले आहेत. देशात चीनमधील वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी वाढत असतानाही कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

भारतातील सर्वांत मोठी स्मार्टफोन विक्रेती कंपनी बनण्याचा शाओमीचा मानस आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी स्मार्टफोनची बाजारपेठ आहे. या महिन्याच्या सुरवातीच्या 18 दिवसांत कंपनीने दहा लाख स्मार्टफोन विक्री केले आहेत. दिवाळी महोत्सवात ही विक्री झाली आहे. शाओमी जागतिक पातळीवरील धोरणात भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. चीनच्या बाहेरील ती सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. शाओमीची स्पर्धक कंपनी हुवेईने भारतात स्मार्टफोन जोडणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील बाजारपेठेत स्मार्टफोनची विक्री कमी होत असल्याने तेथील कंपन्या बाहेरील बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करीत आहेत.

जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहर याला दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील प्रस्तावाला चीनने विरोध केला आहे. यामुळे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालावा, अशी मागणी भारतात जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या कंपन्या मात्र आपले जाळे विस्तारताना दिसत आहेत. 

अहमदाबादमधील सुमारे 70 ते 75 व्यापारी संघटनांना आज बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. यातील उपस्थित सर्व 55 जणांनी चिनी मालावर बहिष्कार टाकण्यास संमती दर्शविली. जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांकडून दहशतवादी घोषित करण्यासाठी सुरू असलेल्या भारताच्या प्रयत्नांना चीनने खोडा घातला तसेच अण्वस्त्र पुरवठा गटातही (एनएसजी) भारताच्या प्रवेशाचा मार्ग चीनने रोखला या निषेधार्थ चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT