Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Mumbai Congress: माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार भाई जगताप हे उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र गायकवाड यांनी उमेदवारी मिळवल्यामुळे हे नेते नाराज झाले आहेत.
Congress Leaders opposes Varsha Gaikwad
Congress Leaders opposes Varsha GaikwadEsakal

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना दिलेल्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये अनेकजण नाराज झाले आहेत.

मंगळवारी वर्षा गायकवाड आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी नाराज काँग्रेस नेत्यांनी वांद्रेच्या एमसीएला एक बैठक बोलावली.

या बैठकीत माजी मंत्री नसीम खान,आमदार भाई जगताप,माजी मंत्री सुरेश शेट्टी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अमरजितसिंह मनहास हे उपस्थित आहे.

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याक,दलित आणि उत्तर भाषिक मतदारांचे प्राबल्य आहे.

माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार भाई जगताप हे उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र गायकवाड यांनी उमेदवारी मिळवल्यामुळे हे नेते नाराज झाले आहेत. नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसने एकाही अल्पसंख्यकाला उमेदवारी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वर्षा गायकवाड या उद्या (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. दुसरीकडे या मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन याचा पत्ता कट करुन कायदेतज्ञ उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.

Congress Leaders opposes Varsha Gaikwad
Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

कोण आहेत वर्षा गायकवाड?

वर्षा गायकवाड हे मुंबई काँग्रेसमधील बडे प्रस्थ आहे. गायकवाड 2004 पासून काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत. तसेच त्यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुराही आहे.

आपल्या चार टर्म आमदारकी दरम्यान गायकवाड यांनी एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून तर एकदा राज्य मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

Congress Leaders opposes Varsha Gaikwad
PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात आता वर्षा गायकवाड यांना प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांचे आव्हान असणार आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतेच निकम यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com