home loan
home loan esakal
अर्थविश्व

होम लोनसह HRAवरही मिळू शकते टॅक्स सूट, कशी ते जाणून घ्या?

सकाळ डिजिटल टीम

Income Tax Benefit: जर तुम्ही Home loan घेऊन पिंपरीमध्ये घर घेतले असेल आणि नोकरीच्या निमित्ताने तुम्ही पुण्यामध्ये भाड्याने घर घेऊन राहात असाल तर तुम्ही होम लोन सह (House Rent Allowance)- HRA वर टॅक्स डिडक्शन क्लेम (Tax Deduction Claim)करू शकता का की नाही? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या.

Salaried Employee ला मिळू शकतो लाभ

एक्सपर्टनुसार, Salaried Employee ने काही अटी पूर्ण केल्यास त्याला या दोन्हीचा लाभ घेता येऊ शकतो. एवढेच नव्हे तर एका शहारामध्ये राहून दोन्ही लाभ घेता येतात.

एक्सपर्टनुसार, HRA (House Rent Allowance) कित्येकदा कॉस्ट टू कंपनीचा(CTC) भाग असतो. यावर टॅक्समध्ये मिळाणाऱ्या सूटचा लाभ तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत तुम्ही भाडे स्वत: भरत नाही. अशामध्ये आपल्या कंपनीला भाड्याचे पावती देऊन तुम्ही HRA क्लेम करू शकता.

Home Loan वर मिळतात हे फायदे

Home Loanवर मुख्यता दोन प्रकारचे टॅक्स बेनफिट मिळतात. एक EMI चे दोन कॉम्पोनेंट असतात. मुद्दल आणि व्याज. मुद्दलवर तुम्ही कलम ८०C च्या अंतर्गत टॅक्स डिडक्शन क्लेम करू शकता. सेक्शन ८० C अंतर्गत अधिकतर १.५ लाख रुपयांपर्यंत टॅक्सची सुट मिळवता येऊ शकते. तसेच व्याजवर तुम्ही वेगळी दोन लाख पर्यंत टॅक्स सूट क्लेम (Tax Deduction Claim) करू शकतो.

या स्थितीमध्ये दोन्हीकडे घेऊ शकता टॅक्स सूटचा लाभ

समजा, तुम्ही पिंपरीमध्ये होम लोन काढून कर्ज घेतले आहे ज्याचे EMI तुम्ही भरत आहात. या घरामध्ये तुमचे आई-वडील राहतात. तुम्ही पुण्यामध्ये किंवा इतर कोणत्याही शहरामध्ये नोकरीनिमित्त घर भाड्याने घेऊन राहात असाल तर तुम्ही होमलोन सह HRA वर देखील सूट मिळवू शकता. जर तुम्ही तुमची प्रोपर्टी भाड्याने दिले असेल किंवा स्वत: भाड्याने राहात असाल तर तुम्हाला दोन्ही लाभ घेता येऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT