American Stock Exchange 
अर्थविश्व

अमेरिकी शेअर बाजारातही आता भारतीयांना करता येणार ‘ट्रेडिंग’

भारतीय छोट्या गुंतवणूकदारांना संधी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एनएसई आंतरराष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई-आयएफएससी) ही राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) मालकीची उपकंपनी असून, या अमेरिकेच्या निवडक शेअर बाजारात लवकरच एनएसई-आयएफएससी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यवहार करता येणार आहेत.

अमेरिकतील समभागांची ही संपूर्ण ट्रेडिंग, क्लियरिंग, सेटलमेंट आणि होल्डिंग आयएफएससी प्राधिकरणाच्या नियामक संरचनेअंतर्गत होणार आहे. आयएफएससी अंतर्गतचा हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून, यात भारतीय छोटे गुंतवणूकदार हे रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या मुक्तनिधी योजनेच्या मर्यादेअंतर्गत व्यवहार करु शकणार आहेत. एनएसई-आयएफएससीच्या या व्यावसायिक मॉडेलअंतर्गत, भारतीय छोट्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची अतिरिक्त संधी तर मिळेलच त्याशिवाय गुंतवणुकीची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि कमी खर्चात होणारी असेल.

अमेरिकेतील शेअर बाजारात व्यवहार होणाऱ्या शेअरशी तुलना करता, गुंतवणूकदारांना आंशिक/मूल्य स्वरूपात ट्रेडिंग करण्याचाही पर्याय उपलब्ध असेल. या प्रस्तावित आराखड्यानुसार अमेरिकेतील शेअर भारतीय गुंतवणूकदारांना परवडणाऱ्या किमतीला उपलब्ध असतील. एनएसई-आयएफएससी लवकरच या सर्व योजनेच्या कार्यान्वयनाची सविस्तर माहिती जाहीर करणार असून, लवकरात लवकर ही योजना बाजारात आणली जाईल, असे ‘एनएसई’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT