Share market esakal
अर्थविश्व

तरूणाईत वाढतेय शेअर मार्केटचे आकर्षण | Share Market

दिपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : केद्र शासनाने आयात-निर्यातीबाबत राबविलेले धोरण, पायाभुत सुविधांना दिलेले प्राधान्य, आत्मनिर्भर (Atmanirbhar Bharat) भारत अंतर्गत उद्योजक व तरूणांसाठी घेतलेले निर्णय अशा विविध धोरण व कारणांमुळे भारतीय शेअर बाजार (Share market) सेन्सेक्स (Sensex) वधारत चालला आहे. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांना होत आहे. आतापर्यत ठराविक लोकांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात पिंपळगांव बसवंत सह परिसराती ग्रामीण भागातील लोकही उतरले आहे. तरूणाईमध्ये शेअर बाजाराची मोठी क्रेझ दिसत आहे. हातातील मोबाईलवरून शेअरची खरेदी विक्री होत असल्याने गुंतवणुकदारांची आकडेवारी झपाट्याने वाढते आहे. मुख्य कारण म्हणजे खात्रीशीर ठराविक उत्पन्नाचा मार्ग म्हणून याकडे पाहिले जात असून अनेक तरूणांनी यासाठी चक्क लाख ते अडीच लाखांपर्यतच्या कोर्सेसलाही प्रवेश घेतला आहे.

कमी भांडवलात अधिक नफा

कोरोना (Corona) काळात अनेकांचा रोजगार (Employment) गेला. उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने शेअर बाजारामधील ट्रेडिंग (Trading) है पैसा मिळविण्याचे नवीन साधन बनू शकते, अशी तरूणाईची मानसिकता झाली आहे. त्यातून कमी भांडवलात त्यांनी हा पर्याय निवडला आहे. जे तरूण अभ्यासपूर्ण पध्दतीने या क्षेत्राकडे वळाले, त्यांना चांगला फायदा मिळत आहे. बाजाराचे ज्ञान न घेता त्यात उडी मारलेले अनेक जण मात्र फाजील आत्मविश्‍वासाने ट्रेडिंग केल्याने तोंडावर आपटले आहेत.
लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात ज्यांनी एंट्री केली, त्यांची गुंतवणुक दुप्पट-तिप्पट वाढली आहे. जे जास्त अवधीसाठी गुंतवणूक करतात, त्यांना हमखास नफा होतो, असे शेअर बाजाराचे सूत्र आहे. मात्र, अल्पज्ञानावर अधिक नफ्याच्या हव्यासाने फ्युचरचा पर्याय निवडतात, त्यांना तोटा होतो, असे तज्ञ सांगतात. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये कमी कालावधीत, कमी वेळेत जास्त नफा मिळत असल्याने नवगुंतवणुकदार तिकडे वळण्याची शक्यता अधिक असते.

राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्थांचे व्याजदर कमी झाल्याने गुंतवणुकदार शेअर बाजाराकडे वळल्याचे दिसून येत आहे. सोन्याच्या वाढीलाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड (Mutual fund) पाठोपाठ शेअर बाजार तरूणाईला खुणावतो आहे. पिंपळगांव शहरातील अनेक तरूण टिव्हीवर खेळ किंवा मनोरंजनाऐवजी शेअर बाजाराची अपटेड देणाऱ्या वाहिन्या बघतांना दिसत आहे.

''गेल्या दीड वर्षापासून शेअर बाजारात खरेदी-विक्री करतो आहे. नामांकीत कंपन्याचे शेअर्स दीर्घकाळासाठी घेतले तर निश्‍चित नफा मिळतो, हा माझा अनुभव आहे.'' - सौरभ बोथरा, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT