Article by Dr Sunil Kardekar On 1992 curfew
Article by Dr Sunil Kardekar On 1992 curfew 
Blog | ब्लॉग

एक जुना लॉकडाउन; त्याची कथा पाशा भाई

डॉ. सुनील करडेकर, परभणी

पाशा भाई. एक अजब वल्ली आणि एक जवळचा दोस्त माझा. १९९० /९१ ला त्याची पहिल्यांदा ओळख झाली. त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायचो. जवळच्याच कॉर्नरला त्याचे सायकल पंक्चरचे दुकान होते. गरीब माणूस अत्यंत लाघवी पण स्वाभिमानी. अधून-मधून जाऊन बसायचो त्याच्या टपरीवर. आणि हो त्यावेळेस ‘प्रिया स्कूटर’ होते. त्यात हवा भरावी लागायची. ‘हीरो’ पिक्चर काही दिवसापूर्वी येऊन गेला होता. त्यात तो अमरीश पुरीचा प्रसिद्ध डायलॉग होता ‘पाशा की भाषा’. तो भेटला की मी त्यानेच सुरवात करायचो. ‘‘क्या चलरा है पाशा की भाषा?’’
दिवस जात राहिले. सिव्हिल सोडून पूर्ण वेळ प्रॅक्टीस सुरू केली. नाही म्हणले तरी थोडा संवाद कमीच झाला. पण, तो यायचा माझ्याकडे अधून-मधून.

८ डिसेंबर १९९२ . बाबरी मज्जिद घटनेच्या तिसऱ्या दिवशी. कडक कर्फ्यू लागलेला. सलग सक्तीची सुटी. तीपण ५-६ दिवसांची मिळाली. त्यावेळेस श्वसूर परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या बंगल्यावर मी, भय्या (माझा साळा) आणि काही मित्र आमचा पत्त्याचा डाव रंगला होता. शिपायाने येऊन वर्दी दिली. ‘‘डॉक्टर साहेब, तुम्हाला भेटायला कोणी मुसलमान माणूस आलाय.’’ मी निघालो बाहेर. तितक्यात 
भय्या : ‘‘दाजी एक मिनीट, मी येतो. एकटे जाऊ नका.’’ 
बाहेर येऊन पाहतो तर ‘पाशा’. चेहरा चिंताक्रांत. 
‘‘अरे पाशा ऐसे वक्त मे ‘काफिरोके’ पास क्यू आया?’’ थोडा थट्टेने म्हणालो. 
‘‘नही साब आपको अभी चलना पडता.’’ 
‘‘किधर बे? तेरे मोहल्ले मी मेरेकू काटने का है क्या?’’
त्याच्या डोळ्यात पाणी. ‘‘नही साहब घरवाली की डिलिवरी है, जाणच पडता.’’ या सर्व संवादात भय्या बारीक नजरेने त्याला न्याहाळत होता. बहुदा दाजीला याच्या बरोबर जाऊ देणे योग्य होईल का, याचा विचार करत होता. घरी आई व सौ. अनिताला कळाले. त्यांनी कडाडून विरोध केला. आई म्हणू लागली, ‘काळ कोणता वेळ कोणती बाबा?’
मी म्हणालो, ‘‘चल आणा तो पडेगाच. जानेका कैसा रे?’’ 
‘‘मै हून ना साब.’’ 

त्याने त्याचा एक पोलिसमधील मामा आणला होता. पुढे ते दोघे लुनावर आणि मागे मी सासरेबुआच्या अम्बास्साडोरमध्ये अशी आमची वरात निघाली. निर्मनुष्य रस्ते व सगळीकडे टेन्शन. मीपण नाही म्हणले तरी थोडा धास्तावलेला होतोच. त्याच्या मोहोल्ल्यात पोचलो. खाली फतकल मांडूनच डिलिवरी केली. बाळ थोडे अशक्त होते. त्याला व्हिटॅमीन के दिले. नाळ बांधला. सर्व काही सुखरूप झाले.
‘‘चलता बे पाशा.’’ 
‘‘साब आप कभी फीस नही लेते, लेकीन आज लेनाच पडता.’’ 
मी : ‘‘अबे फीस के लिये आय क्या मै?’’ त्याच्या चेहऱ्यावर कृतद्यनता ओसंडून वाहत होती. 
‘‘ठीक है साब, एक मिनिट ठैरो.’’ 
तो घराच्या पिछवाड्याकडे निघाला. मी त्याच्या मागेच. 
‘‘अरेऽऽऽ अरेऽऽऽ  पाशा क्या करता है.’’ 
मागे मोठे खुराडे. त्यात ७-८ कोंबड्या. त्यातल्या त्याने ३ काढल्या आणि गाडीच्या डिक्कीत टाकल्या. 
‘‘साब बहुत दिनोसे बचाके रख्खा था आज काम आये. बाहेर तो कुच्ह नही मिलनेवाला अभी २/३ दिन.’’ त्याचा आग्रह मोडवला नाही. त्याच्या मोहल्ल्यात जातानाची भीती आठवून स्वतःची थोडी लाजच वाटली. गृहस्थ अजूनही अधून-मधून येतो. कोंबडी कापून आणि बनवून घेऊन येवू का विचारतो. काळानुसार कोंबडी खाणे कमी झाले. कमी नाही झाला त्याचा माझा स्नेह.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT