BJP high command's coup in Karnataka 
Blog | ब्लॉग

भाजप हायकमांडचे कर्नाटकात धक्कातंत्र...

रवींद्र मंगावे

एकीकडे सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, अर्थचक्र थंड असल्याने प्रत्येक नागरिक चिंतेत आहे; पण कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरूच आहेत. राज्यसभा उमेदवारीवरून कर्नाटक भाजपला हायकमांडने झटका दिला. राज्यातून शिफारस केलेली नावे वगळून स्पर्धेत नसलेल्या दोन सामान्य व निष्ठावंत कार्यकर्त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. यातून मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासह राज्यातील सर्वच भाजपच्या दिग्गजांना हायकमांडने सावध इशाराच दिला. तर सामान्य कार्यकर्त्याला स्थानिक नेत्यांनी डावलले तरी दिल्लीतून लक्ष असल्याचेही कार्यकर्त्यांसाठी सकारात्मक चित्र दिसले.

राज्यसभा उमेदवारीवरून दोन आठवडे चर्वितचर्वण सुरू होते. त्यात एका जागेसाठी हॉटेल उद्योजकाचे नाव तर दुसऱ्या जागेसाठी बेळगावमधून विद्यमान सदस्य डॉ. प्रभाकर कोरे व माजी खासदार रमेश कत्ती यांची नावे पाठवण्यात आली होती. अलीकडे कोरे व कत्ती यांच्यात राजकीय वैमनस्य वाढल्याने त्यांच्यात मला नाही तर तुलाही नाही, इथपर्यंत टोकाची ईर्ष्या गेली होती. त्यामुळे राज्याने शिफारस केलेली दोन्ही नावे रद्द करून नवी नावे जाहीर करून कर्नाटक भाजपला दिल्लीतील नेत्यांनी फटकारले आहे.

याप्रकरणात भाजप हायकमांडने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. दिग्गजांना "हम करे सो...' हा प्रकार खपवून घेणार नसल्याचा स्पष्ट संदेश पक्षाने दिला. सामान्य कार्यकर्त्याचीही पक्षात चांगलीच दखल घेतली जाते हा संदेश पक्ष कार्यकर्त्यांत पोहचून त्यांना बळ देण्याचाही प्रयत्न झाला. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनाही सावधानतेचा इशारा मानला जात आहे. सत्तांतर करण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या मंत्री रमेश जारकीहोळी यांनाही तुम्ही म्हणजे अंतिम नव्हे असे अनेकांना एक प्रकारचा इशारा देण्यात आला. जारकीहोळी यांच्या तालुक्‍यातील इराण्णा कडाडी यांना राज्यसभेची संधी देऊन पक्षाने त्यांच्यावर कडी ठेवली आहे. जारकीहोळी पक्षांतर करून आलेले असल्याने त्यांना मंत्रिपद जरी देण्यात आले असले तरी त्यांची वैयक्तिक ताकद वाढून पक्षाला काही धोका पोहचू नये, याचीही काळजी घेतली गेली.

दुसरे उमेदवार अशोक गस्ती हे रायचूर जिल्ह्याचे ओबीसी मोर्चाचे सचिव आहेत. अशा सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले आहे. हॉटेल उद्योजकाचे नाव गेल्या महिन्यापासूनच अंतिम करून बसलेल्या राज्यातील नेत्यांना हा मोठा फटका आहे. हायकमांडने निष्ठावंत कार्यकर्ता जय हो! म्हणून अनेक प्रतिष्ठितांना धक्काच दिला. या धक्कातंत्राचे धक्के राज्यातील सत्तेला बसू नयेत, यासाठी त्याची मोर्चेबांधणीही आता दिल्लीतूनच होण्याचे संकेत आहेत. कारण, जी नावे पक्षाने नाकारली ती राज्यातील दिग्गज नेत्यांपैकी असून त्या त्या समाजात वर्चस्व प्रस्थापित करून राहिलेली आहेत. त्यामुळे भाजपला हे धक्कातंत्र महागात पडणार की त्याची पूर्वतयारी पक्षाने आधीच करून ठेवली आहे, हे येत्या काळात दिसेल. तोपर्यंत तरी भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना बळ मिळाले असून दिग्गजांना सावध हाका, पुढील... हाच संदेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT