Mahesh Raut
Mahesh Raut 
Blog | ब्लॉग

अटक केलेल्या महेश राऊत यांच्या समर्थनार्थ एक पत्र

सकाळ डिजिटल टीम

कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या संदर्भात पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात काही जणांना अटक केली. त्यात महेश राऊत यांचाही समावेश आहे. पंतप्रधान ग्रामीण विकास योजनेमध्ये काम करणार्‍या जवळपास ८० हून अधिक अधिकार्‍यांनी (फेलो) महेश यांच्या समर्थनार्थ एक पत्र लिहिले आहे. हे पत्र पुढीलप्रमाणे :

पंतप्रधान ग्रामविकासचे माजी फेलो (पीएमआरडीएफ) महेश राऊत यांना नागपूर येथून पोलिसांनी 'यूएपीए'अंतर्गत अटक केल्याची बातमी वाचण्यास मिळाली. 'यूएपीए' कायद्यातील प्रखर कलमांचा वापर प्रामुख्याने गंभीर आणि देशविरोधी गुन्ह्यांसाठी होतो. म्हणूनच या कलमांतर्गत महेशला झालेली अटक आमच्यासह अनेक 'पीएमआरडीएफ'ला धक्का देणारी आहे.

फेलो म्हणून महेश यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात दोन वर्षे जिल्हा प्रशासनासोबत राहून काम केले. 'पीएमआरडीएफ' म्हणून आम्ही त्याचे काम जवळून पाहिले आहे. ज्या गावांमध्ये/क्षेत्रांमध्ये शासन पोचू शकले नाही, अशा ठिकाणी स्वातंत्र्यानंतर प्रथमच शासकीय शिबिरे आणि मेळावे घेत महेश यांनी स्थानिकांचा विश्वास राज्यघटना, शासन आणि शासकीय संस्थेत रुजविला आहे.

व्यवस्थेने दुरावलेल्या ग्रामस्तरावरील लोकांना निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी महेश काम करत असताना आम्ही पाहिले आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून सातत्याने काम करून महेश यांनी गावस्तरावरील लोकशाही संस्थानांना मजबूत करून लोकांचा विकासकार्यातील सहभाग वाढविला आहे. विकास किंवा  प्रगतीचा खरा अर्थ लोकांच्या बाजूने उभे राहून लोकांच्या भल्यासाठी सामूहिकरित्या कायदा आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणे, असा असतो. लोकांसाठी सर्वस्व त्यागणारे महेशसारखे युवक या युगात क्वचितच आढळतात. न्यायालयाच्या निर्णयाआधीच महेशला नक्षलवाद्यांशी जोडण्याचे बेजबाबदारीचे काम प्रसिद्धीमाध्यमे करत आहेत. या आरोपांतून निर्दोष मुक्त होऊन महेश पुन्हा नव्या जोशाने लोकांसाठी काम सुरू करेल, अशी आम्हाला आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT