two engineer die in mseb transformer blast
two engineer die in mseb transformer blast  
Blog | ब्लॉग

दोष कुणाचा... शिक्षा कुणाला

प्रवीण खुंटे

तीने नुकतेच आपले अभियांत्रीकीचे शिक्षण पुर्ण केले होते. त्याच्या जोरावर एका मल्टीनॅशनल कपंनीत चांगली नोकरीही मिळाली होती. आपल्या कष्टाचे चिज झाले म्हणून कुटुंबीय खुश होते. आयुष्याच्या नविन टप्प्यावरील वाटचाल सुरू झाली होती. हजारो स्वप्न डोळ्यात होती. ती साकारण्याचा मार्गही सापडला होता. तिला कामाला लागून काही महिनेच झाले होते. काम करताना अनेक निवन मित्र मिळाले. दररोज सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान ऑफीस मधील अनेक सहकारी कंपनीच्या बाहेर असलेल्या टपरीवर चहा प्यायला यायचे. ति सुद्धा यायची. पण 11 मे 2018 हा दिवस तीच्या सोबत तिच्या एका सहकाऱ्याच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला. 

त्या दिवशी दोघेच चहा प्यायला आले होते. चहा पिऊन झाल्यावर रस्त्यावरील फुटपाथवरून ऑफिसकडे निघाले. पण, अचानाक रस्त्यावर असणाऱ्या MSEB च्या खांबवरील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला त्यातील जळते ऑईल दोघांच्याही अंगावर उडाले. या अपघातात दोघेही 50 टक्क्यापेक्षा जास्त भाजले. त्यांना तातडीने शनिवारवाड्या जवळील सुर्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात होते. 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्यामुळे दोघांचीही प्रकृती गंभीर होती. उपचाराचा खर्ज काही लाखांमध्ये आला होता. दोघांच्याही घरची परिस्थिती जेमतेम. नविनच कामाला लागल्यामुळे कंपनीकडून केवळ लाखभर रुपयांची मदत मिळाली. उपचाराचा खर्च अधिक असल्यामुळे ऑफीसमधील मित्रांनी त्यांच्यापरीने आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला. पण एवढ्याने भागेना उपचारासाठी दिवसाला किमान 30 ते 40 हजारांचा खर्च येत होता. एवढे पैसे कुठून आणणार यासाठी कुटुंबियांनी अनेकांच्या घराचे उंबरे झिजवले. मुख्यमंत्री विमा योजनेतून काही  मदत मिळते का हे पाहिले. पण तिथेही निराशाच हाताला लागली. MSEB ने हात वर केले कोणत्याही प्रकराची मदत केली नाही. शेवटी उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे. मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला आपल्या गावाकडी साध्या रुग्णालयात दाखल केले. त्या दोघांनीही महिनाभर मृत्यूंशी झुंज दिली. पण शेवटी त्यांची झुंज अपुरी ठरली. शुक्रवार (ता. 15) जूनला सकाळी त्याने प्राण सोडला तर शनिवार (ता. 16) जूनला सायंकाळी तिच्या प्राणाची ज्योत मालवली. 

दोघेहांचाही जिव गेला. आता प्रश्न उरतो यामध्ये दोष कुणाचा
प्रियंका आनंदराव झगडे (वय 24, रा. नांदवळ, ता. कोरेगाव), आणि पंकज कृष्णराज खुने (वय 27, रा. आर्वी वर्धा). या दोन तरूण अभियंत्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यातील खराडी भागात एका मल्टीनॅशनल कंपनीत दोघेही नोकरी करत होते. या प्रकरणात MSEB च्या कार्यालयाने हात वर केले आहेत. ह्या घटनेमध्ये आमचा काहीही दोष नसून, विजेच्या खांबाजवळ असलेल्या टपरीवर सिलेंडरचा स्फोट झाला. त्याच्या ठिणग्या ट्रान्सफॉर्मरवर उडल्याने त्याचा स्फोट होऊन ही घटना घडली. यामध्ये MSEBची काहीही चूक नाही. असा अहवाल MSEB च्या निरीक्षकांनी कंपनीला पाठवला आहे. तिकडे चहाचा टपरीवाला हा स्फोट माझ्यामुळे झाला नसून यामध्ये MSEBचा दोष असल्याचे सांगत आहे. या प्रकरणात निरीक्षकांनी दिलेला अहवाल आणि टपरीवाल्याची चौकशी करून या दुर्घटनेस कारणीभूत असणाऱ्यांविरुद्ध पोलिस कारवाई करणार आहेत. कारवाई नक्की कशी होईल माहित नाही.

पण या कारवाईमुळे प्रियंका आणि पंकजचे प्राण परत येणार आहेत का? याचे उत्तर कोणाकडेच नसावे. आता रस्त्यावरून चालणेही सुरक्षित राहिले नाही. या घटनेनंतर व्यवस्थेची उदासिनता पुन्हा एकदा समोर आली आहे. दोन तरूण अभियंत्यांचा त्यांची काहीही चूक नसताना हकनाक बळी जातो. आणि प्रत्येकजण यात माझी कशी चूक नाही हे दाखविण्याचाच जास्त प्रयत्न करतो. हे सगळं चिड आणणारं आहे. जबाबदारी स्विकारण्याऐवजी पळकुटे पणाने स्वतःची कातडी वाचविण्याचा प्रयत्न सगळ्यांकडून होत असेल तर ही परिस्थिती निराशाजनक आहे. अशे किती प्रियंका आणि पंकज आणखी हकनाक आपला जीव गमवणार आहेत कुणास ठाऊक. शासनालाही एखाद्याचा मृत्यू झाल्याशिवाय घटनेचे गांभिर्य कळत नाही. असे का होते? ही परिस्थिती अशीच राहणार आहे का? याचा कुणालाच काही फरक पडत नाही का? मरणारे मरत आहेत, करणारे करत आहेत असंच सुरू राहणार असेल तर हे समाजाच्या हिताचे नाही. इथून पुढे कुठल्याही प्रियंका आणि पंकजचा हकनाक बळी जाणार नाही याचा गंभीर विचार केवळ शासनानेच नव्हेतर समाजानेही करावा हीच विनंती.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT