Girish Bapat
Girish Bapat 
Blog | ब्लॉग

LokSabha2019 : भाऊंचे प्रमोशन होणार...  

ब्रिजमोहन पाटील

गेल्या पाच टर्म 'कसब्याची ताकद... गिरीश बापट...' अशा घोषणा देणारे कार्यकर्ते आज 'पुण्याची ताकद... गिरीश बापट...' असे घसा कोरडा पडे पर्यंत ओरडत होते. भाऊंबद्दल असणारे प्रेम ओसंडून वाहत होते. आमदार मंडळीही खुश होती, विशेष म्हणजे कसब्यातील भावी आमदारांच्या तर चेहऱ्यावरचा आनंद लपून रहात नव्हते. त्यात मोहन जोशींना दिलेल्या उमेदवारीमुळे उत्साहात भर पडली. कारण काय तर भाऊंचा विजय पक्का... भाऊ आता दिल्लीला जाणार... भाऊंचे प्रमोशन होणार... 

महायुतीचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांचा लोकसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी ग्रामदैवत कसबा गणपती ते नरपतगिरी चौक अशी मिरवणुक काढली. ढोल ताशा, हलकीच्या आवाजाने उत्साहाचा मालोह तयार केला होता. पक्षातले सगळेच पदाधिकारी, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते गटतट विसरून आज एकत्र आले. एकत्र फोटो काढत होते, सेल्फी काढत होते. माघारी एकमेकांना महापालिकेत शिव्या घालणारे माननिय आज टाळ्या देत गप्पा मारत होते. असा दुर्मिळ योग आज मिरवणुकीत पहायाल मिळाला. कारण काय तर गेले 45 वर्ष कसब्यासह पुण्यात राजकारण करणारे भाऊ खासदार होणार... 

2014 ला तिकीट न मिळाल्याने बापट यांची खासदार होण्याची संधी हुकली. गेल्या पाच वर्षात भाजपची ताकद वाढली. आठ आमदार आले, राज्यात भाजपची सत्ता आली. वर्षानूवर्ष विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम केल्यानंतर गिरीश बापट हे पालकमंत्री झाले. महापालिकेत पक्षाची निर्वीवाद सत्ता आली. हे सगळ पुण्याच्या इतिहासात प्रथमच झाले होते. भाजप एवढा शक्तीशाली झालेला असताना पुण्यातून खासदार म्हणून निवडून जाण्याची मजा काही वेगळीच आहे हे भाऊंना पक्के माहिती आहे. आज तर संजय काकडे यांनी बापट यांच्या मताधिक्‍याचा आकडा दोन लाखाने वाढवला. कॉंग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिल्याने बापट पाच लाख मतांनी निवडून येतील असा दावा केला. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी तर सोशल मिडीयावरील मेसेजचा आधार घेत "कॉंग्रेसचा उमेदवार बापट यांनीच निश्‍चीत केला आहे, अशी उपहासाने चर्चा सुरू असल्याचे सांगितले.' महापौर मुक्ता टिळक यांनीही वेळ साधून "" ज्यांना उमेदवार मिळत नाही ते शहराचे काय रक्षण करणार' असा टोला लगावला. आजची अर्ज भरण्याची मिरवणुक आणि सभा जशी काय निकालानंतरचीच आहे असे वातावरण निर्माण झाले होते. कारण आता भाऊ खासदार होणार... 

आजची मिरवणुक म्हणजे काहींचे बापट यांच्यावरील प्रेम होते... काहीचा भाजपचा खासदार फिक्‍स असा आनंद होता... बापट यांच्या निकालावर काहींचे भवितव्य अबलंबून असल्याने त्यांचा उत्साह वेगळा होता...तर खासदार होऊन पुण्याच्या राजकारणावर पकड मिळवण्याचा मानस असलेल्या गिरीश बापट यांचा आनंद वेगळा होता... अशा सगळ्या भाजपच्या आनंदयात्रींनी आज बापट यांचा एकदिलाने अर्ज भरला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT