sharad pawar-devidas pingale
sharad pawar-devidas pingale esakal
Blog | ब्लॉग

पक्षाचा पहिला विधान परिषद आमदार होण्याचा मान..!

योगेश मोरे

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जूनला २२ वा वर्धापन दिन. त्यानिमित्त स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले, नाशिकचे माजी खासदार तथा नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. या वेळी पिंगळे यांनी पक्षाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीचा थोडक्यात पट मांडला.

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जूनला २२ वा वर्धापन दिन. त्यानिमित्त स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले, नाशिकचे माजी खासदार तथा नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. या वेळी पिंगळे यांनी पक्षाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीचा थोडक्यात पट मांडला. या वेळी त्यांनी शरदचंद्र पवार यांच्यासोबत घालविलेले काही अविस्मरणीय क्षणही कथन केले.

(Devidas Pingle about NCP anniversary)

पक्षाने संधी दिली अन् संधीचे सोने केले

६ जून १९९९ ला पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकनिष्ठ राजकीय वाटचाल सुरू असल्याचे पिंगळे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला विधान परिषद आमदार होण्याचा मानही साहेबांमुळेच मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पक्षस्थापनादिनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पक्षाचा मेळावा झाला. नाशिक जिल्ह्यातून एक सदस्य म्हणून पिंगळेदेखील त्या मेळाव्याला उपस्थित होते. स्थापनेनंतर २००० मध्ये झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ७० पेक्षा जास्त जागा मिळविल्या. पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच विधान परिषदेसाठी पिंगळे यांना पक्षाने संधी आणि त्यांनीही या संधीचे सोने केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला विधान परिषद आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला.

साहेबांच्या शब्दाखातर लोकसभा निवडणूक लढवलो

आमदारकीची तीन वर्षे पूर्ण झाली होती. त्या वेळी जिल्हा बँकेचे निवडून आलेले सदस्य घेऊन ते गोव्याला गेले होते. त्या वेळी पवारसाहेबांनी अचानक त्यांना मुंबईत बोलावून घेतले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट विमानाने मुंबई गाठली. ‘सिल्व्हर ओक’वर पवारसाहेबांशी बैठक सुरू झाली. या वेळी लोकसभेसाठी नाशिकमधून योग्य उमेदवार कोण, अशी विचारणा त्यांनी केली. पिंगळे यांनीही नाशिक जिल्ह्यातील तीन ज्येष्ठ नेत्यांची नावे सुचविली. परंतु, साहेबांनी तुला काय हरकत आहे, असे मध्येच विचारले. मनात काहीही नसताना साहेबांनी अचानक लोकसभेची दिलेली ऑफर कशी नाकारायची, असा विचार करून आमदारकीची अजून दोन वर्षे बाकी असल्याचे त्यांना नम्रपणे सांगितले. परंतु, आमदारकी महत्त्वाची की खासदारकी असे सांगत साहेबांनी लोकसभेच्या तयारीला लागण्यास सांगितले. साहेबांच्या शब्दाखातर पिंगळे यांनी निवडणूक लढवली आणि त्यांचा शब्द खरा करून दाखवला. खासदार झाल्यामुळे पुढे साहेबांसोबत बऱ्याच दौऱ्यावर जाण्याची त्यांना संधी मिळाली. बरेच काही शिकण्यास मिळाले.

सदैव पक्षाशी एकनिष्ठच!

पक्षासमवेत राजकीय प्रवास एकनिष्ठपणे सुरू असताना मध्यंतरीच्या काळात काही संकटे आली. मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्याचा प्रयत्नदेखील झाला. अन्य पक्षांनी ऑफरही दिल्या. परंतु पिंगळे न डगमगता पक्षाशी एकनिष्ठ राहिले. या खडतर प्रवासात साहेबांकडून वडिलकीच्या नात्याने खूप आधार मिळाल्याचेही पिंगळे यांनी सांगितले.

(Devidas Pingle about NCP anniversary)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT