Donald Trump says Corona herself will disappear
Donald Trump says Corona herself will disappear 
Blog | ब्लॉग

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'कोरोना स्वतःच होईल गायब...!'

संजय उपाध्ये

आपल्या आक्रमक आणि बेधडक वक्तव्याबद्दल जगभर प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'जगभरातील कोरोना आपल्या आपून गायब होईल', असे सांगत ठिणगी टाकली आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून एकट्या अमेरिकत दररोज चाळीस-पन्नास हजार कोरोनाबाधितांची संख्या आढळून येत आहे. त्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे हे वक्तव्य सर्वानाच खटकून गेले.
जॉन हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरद्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या माहितीपत्रकात एका दिवशी कोरोनाबाधीतांची संख्या ही 52 हजार इतकी आढळून आली आहे. जी जगात कोणत्याही देशाच्या एका दिवसात आढळून आलेल्या बाधीतांपेक्षा फारच मोठी आहे. त्यानंतर अमेरिकेतील तज्ज्ञ, डॉक्‍टर, शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, चाळीस-पन्नासचा हा आकडा लवकरच एक लाखापेक्षा अधिक होईल. म्हणजे दररोजी बाधा होणाऱ्यांची संख्याही एक लाखाचा आकडा पार करेल. आणि असे जर सुरु झाले तर अमेरिकीतील सर्वच रुग्णालये भरुन वाहून लागतील. सर्वांवर उपचार करणे कठीण जाईल. आरोग्य व्यवस्था विस्कळीत होईल.

नुकत्याच एका मुलाखतीत ट्रम्प यांनी कोरोनाचा विषाणू स्वतःच संपून जाईल, असे सांगितले. त्यावर मुलाखतकर्त्यांने पुन्हा ट्रम्प यांना विचारले की, आपल्याला खरेच हा विषाणू संपून जाईल, असे वाटते? त्यावर ट्रम्प पुन्हा म्हणाले, "होय हा कोरोनाचा विषाणू स्वतःच गायब होईल, तसेच आम्ही त्यावर लवकरच लस बनविण्यात यशस्वीही होऊ. आम्ही अतिशय काळजीपूर्वक पाऊले टाकत आहोत. आणि मला आत्मविश्‍वास वाटतो की, कोरोना विषाणूबाधाबाबात लवकरच चांगल्या स्थितीत येऊ.' त्यानंतर ट्रम्प यांची ही उलटसुलट वक्तव्ये पाहून मुलाखतकर्ताही काहीकाळी भांबावून गेला.

त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. कोरोनाविषाणूबाबात ट्रम्प सरकारे काळजीपूर्वक काहीही केलेले नाही. खुद्द ट्रम्प हे सार्वजनिक ठिकाणी आतापर्यंत एकदाही मास्क वापरलेले नाही, यावरुन ट्रम्पच किती निष्काळजीपण वागत आहेत, याबद्दल समजून येते, अशी खंतही व्यक्त होत आहे. मास्कबाबतही मुलाखतीत छेडल्यानंतर ते पुढे म्हणाले, "मास्क बरोबर आहे, ते लावला पाहिजे, पण संपूर्ण देशात प्रत्येकाला अनिवार्य करणे गरजेचे नाही.' अमेरिकेत बाधीतांची संख्या ही जगात सर्वात जास्त असून लवकरच ती तीस लाख होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. पण नागरीकही मास्क लावणे, लॉकडाऊन करणे याच्या विरोधातच आहेत. अमेरिकेतील काही राज्ये क्वारंटाईनचे नियम अधिक कडक केले आहेत. पण संपूर्ण अमेरिकेतच कोरोनाबाबत गांभीर्य दिसत नाही.

आज अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन

अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन 4 जुलैला असतो. सर्व देशबांधवासाठी हा एक मोठा सणच आहे. देशभरातील प्रत्येक राज्यात त्यानिमित्त विविध कार्यक्रम होतात. पण आता कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांची एकमेकांशी संपर्क वाढेल, अशी भितीही व्यक्त होत आहे. त्यामुळे 4 जुलैच्या कार्यक्रमांकडे अवघ्या अमेरिकेचे लक्ष लागून राहिले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT