ANI
Blog | ब्लॉग

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे अखेरचे क्षण

कार्तिक पुजारी

ब्रिटिश गव्हर्नरने राज्य खालसा केल्याचा आदेश काढला पण त्या आदेशाला झुगारून झाशीच्या राणीने राज्याच्या रक्षणासाठी आणि हक्कासाठी स्वत: शस्त्र हाती घेतलं.

झाशीची राणी लक्ष्मीबाई (9 नोव्हेंबर 1835 ते 18 जून 1858) यांचे नाव इतिहासात अजरामर झालं आहे. 1857 च्या लढ्यात त्यांनी दाखवलेलं शौर्य आणि त्याग असामान्य होता. राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर होते. 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. गंगाधरराव नेवाळकर आणि लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला. परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. या गोष्टीमुळे गंगाधरराव अंत्यंत दु:खी झाले आणि शय्येला खिळून पडले. त्यानंतर गंगाधरराव यांनी त्यांच्याच नात्यातील एका मुलाला दत्तक घेतले. दत्तक घेतल्याच्या दुसऱ्याच वर्षी गंगाधरराव यांचा मृत्यू झाला.

गंगाधररावांच्या निधनामुळे झाशी खालसा करण्याची आयती संधीच तत्कालीन गव्हर्नर जनरल डलहौसीला मिळाली. राजाला स्वतःचा मुलगा असेल तर त्याला उत्तराधिकारी मानले जाईल. दत्तक पुत्र वारस असणार नाही असा जाहीरनामा डलहौसीने काढला आणि झासी खालसा झाल्याचं त्यानं जाहीर केलं. या काळात राणी लक्ष्मीबाई राज्यकारभार पाहात होत्या. त्यांनी डलहौसी यांना अनेक अर्ज-विनंत्या केल्या. पण, त्याचा काही परिणाम झाला नाही. शेवटी राणी लक्ष्मीबाईंना आपल्या हक्कासाठी आणि झाशीच्या रक्षणासाठी हाती शस्त्र घ्यावं लागलं.

राणी लक्ष्मीबाई यांचे अखेरचे क्षण कसे होते

झाशीवर चालून आलेल्या ब्रिटिश सैन्याचं नेतृत्त कॅप्टन रॉड्रिक ब्रिग्ज करत होता. त्याला राणीशी प्रत्यक्ष लढायचं होतं, पण तसा योग आला नाही. ब्रिटिशांचे सैन्य राणीच्या सैन्याच्या तुलनेत अधिक होते. अशाही परिस्थितीत राणीचे सैन्य शौर्याने लढत होते. स्वत:ची राणीच रणांगणात उतरली असल्याने त्यांच्यात जान आली होती. पण, लढाईला सुरुवात झाल्यानंतर काहीवेळाने नव्या दमाचे ब्रिटिश सैन्य डोंगराच्या मागून युद्धस्थळी दाखल झालं. त्यामुळे राणीच्या सैन्याचा प्रतिकार कमी पडू लागला.

राणीने परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या काही निवडक सैन्याला मागे येण्यास सांगितलं. पंधरा घोड्यांचा एक जत्था त्यांच्यामागे निघाला. राणी आणि तिच्या सैन्याने एक मैल अंतर कापलं होतं. तोच, ब्रिटिशांच्या सैन्याने त्यांना गाठलं. पुन्हा आमनेसामनेची लढाई सुरु झाली. राणीच्या दोन्ही हातात तलवार होती, त्या दोन्ही बाजूच्या सैन्यांना टिपत होत्या. अचानक एका इंग्रज सैन्याने राणीच्या छातीत सुरा खुपसला. जखमेतून रक्त येऊ लागलं. घोड्यावरुन जाताना राणीला एक छोटा ओढा लागला. त्यांनी घोड्यावरुन ओढा पार करण्याचा प्रयत्न केला. पण, घोड्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. घोडा जागचा हलला नाही. त्यातच राणीला कमरेच्या डाव्या बाजूला बंदुकीची गोळी लागल्याचं जाणवलं.

एक इंग्रज राणीच्या घोड्याजवळ आला आणि त्याने वार करण्यासाठी तलवार उचलली. राणीने प्रतिकार म्हणून आपली तलवार पुढे केली. पण, राणीमध्ये अवसान राहीलं नव्हतं. इंग्रजाच्या तलवारीने राणीचे अर्ध डोकं फाटलं. राणीला आता सगळं धुसर दिसत होतं. त्यामुळे ती घोड्यावरुन पडली. एका सैनिकाने त्यांना उठवलं आणि जवळच्या मंदिरात नेलं. राणीची आता हळूहळू शुद्ध हरवत होती. एक डोळा पूर्ण निकामी झाला होता. त्यांनी अवसान आणून आपल्या सैनिकाला म्हटलं की, दामोदरला छावणीमध्ये सुरक्षित न्या. माझा मृतदेह इंग्रजांच्या हाती पडू देऊ नका. राणीच्या जखमांमधून रक्त वाहतं होतं. अखेर झाशीच्या राणीला एक झटका बसला आणि एका शूर महिलेची प्राणज्योत मावळली. अंगरक्षकांनी जवळच राणीच्या पार्थिवाला अग्नी दिला. 'द वॉरियर क्वीन' या पुस्तकात अँटोनिया फ्रेजर यांनी याचा उल्लेख केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT