

Amul Milk Prices Increased by Rs 2 Per Litre Across India from May 14, 2026
esakal
देशातील सर्वांत मोठ्या डेअरी ब्रँडने ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा धक्का दिला आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (GCMMF) ने दुधाच्या किमतीत प्रति लिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही वाढ १४ मे २०२६ पासून देशभरात लागू होणार आहे. यासोबत मदर डेरीनेही दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.