जातीवैविध्य असलेल्या महाराष्ट्रात मागच्या अनेक शतकांपासून दलितांवर अत्याचार सुरू आहेत. पण हल्लीच्या काळात अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. मागील काही वर्षांपासून अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसते.
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात तमाशाचा कार्यक्रम झाला. विठ्ठल ऊर्फ नितीन कांतीलाल शिंदे, वय वर्षे- ३७ या माणसावर तेथील स्थानिक उच्चवर्णीय तरूणांनी हल्ला केला. "तो दलित आहे. त्याची आमच्याशी बरोबरी होऊ शकत नाही. अशांना जगण्याचा अधिकार नाही." असे त्या तरूण टोळीने सांगितले.
त्याच्या जातीवरून शिवीगाळ करून त्याचे मानसिक खच्चीकरण केले. तिथून त्याला स्मशानभूमीत नेले. त्याच्या अंगावरचे कपडे काढून नग्नावस्थेत मारहाण केली. विठ्ठल लज्जास्पद अवस्थेत घरी परतला तेव्हा मेल्याहून मेल्यासारखे झाले होते.
त्याने आपल्या कुटुंबाला घडलेली घटना सांगितली आणि मी माझे जीवन संपवणार आहे असे त्याने घरच्यांना सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्या केली. विठ्ठलच्या कुटुंबाने त्याला न्याय मिळावा म्हणून आंदोलन केले व मृतदेह स्वीकारण्यापूर्वी आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
याच काळात नांदेडमध्येही एक घटना घडली. बंदर हवेली गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी भालेराव हा २४ वर्षांचा दलित मुलगा रस्त्याने चालत होता. तिथेच जवळ एका उच्चवर्णीय व्यक्तीच्या लग्नात आलेले काही जण तलवारी घेऊन आले होते. भालेरावला बघत एक आरोपी म्हणाला, "गावात भीमजयंती साजरी करतात हे भीमटे, यांना मारलंच पाहिजे" आणि त्याने भालेराववर हल्ला केला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
अशा घटना सातत्याने घडत आहेत. समतावादी विचारधारेवर आधारलेल्या महाराष्ट्रात दलितांवर नाहक अत्याचार होत आहेत. चंद्रपूरमध्ये सात दलितांना लाकडी खांबाला बांधून मारहाण केली गेली. तेथील अधिकाऱ्यांनी दिवसभर दखलही घेतली नाही. सोलापूरमधील वालवड गावात सार्वजनिक स्मशानभूमीत प्रवेश दिला जात नाही. जमीन दिसेल तिथेच अंत्यसंस्कार करतात. या घटना मागील १ - २ वर्षांत घडल्याचे दिसते. दर वर्षी शेकडोहून जास्त घटना घडत आहेत.
"या सातत्याने घडणाऱ्या घटनांकडे सरकार लक्ष का देत नाही? अजूनही दलितांनी जीव मुठीत ठेवून जगत राहायचं का? त्यांना किड्यामुंगीची वागणूक दिली जातेय," असा रोष महाविकास आघाडीने व्यक्त केला. याला विरोध म्हणून विरोधी पक्ष देशातील कानाकोपऱ्यात आंदोलने करत आहेत व जनतेला न्याय मिळवून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
"महाराष्ट्र या पूर्वी कधीच कोणत्याच जाती, धर्मांत भेदभाव करत नव्हता पण मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राची, तसेच देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही वर्षांपासून अतिशय वाईट राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्याला बदनाम करण्याचे काम हे सत्तेतील सरकार करत आहे. जातीजातीत भेद निर्माण करून भांडणे लावू पाहत आहेत. राज्यात, देशात गुंड पैदा करण्याचे काम हे सरकार करत आहे," असा तीव्र आरोप करत महाविकास आघाडीने सरकारवर हल्लाबोल चढवला.
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा घडवण्याचे ध्येय मनी जतन करून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जनतेला एकत्र घेऊन विकासाच्या मार्गावर चालत आहेत. ते कोणत्याच जातीधर्मात भेद करत नाहीत.
"देशात उत्तम लोकतंत्र व न्यायव्यवस्था असूनही धर्माच्या नावाने विष पेरले जाते आहे. जात-धर्म-भाषा-प्रांत यात भेद निर्माण होत आहेत, सर्व अधिकार केंद्राकडे वळलेत. महागाई व बेरोजगारीमुळे सामान्यांचे जीवन कष्टप्रद झाले आहे.
या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार लक्ष का घालत नाही? हे सत्य सरकारला दिसत नाही का?" अशी खदखद महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व्यक्त करतात. काँग्रेस पक्षप्रमुख राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' पदयात्रेत दिलेल्या एकात्मतेच्या संदेशानुसार सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं नाना पटोले म्हणतात.
गोंडगोवारी समाजावर मागील अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे. त्यांचा अनुसूचित जातींमध्ये सरकार समावेश करून घेत नव्हते. याचा पाठपुरावा नाना पटोलेंनी केला. सरकारवर टीका करत आक्रमक वक्तव्य केले. हा लढा अजूनही सुरूच आहे, पण नाना पटोलेंनी त्यांना हक्काच्या जमिनी मिळवून दिल्या, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरूच आहे. त्यांनी केलेली ओबीसींसाठीची चळवळ, शेतकऱ्यांसाठी आंदोलने अशी समाजकार्ये ते सातत्याने करत असतात. "मला शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र बनवायचा आहे. ज्या महाराष्ट्रात माणसाला कोणत्याच जाती, धर्मावरून नाही तर माणूस म्हणून पाहिलं जाईल. सरकार जातीधर्माचे राजकारण खेळून द्वेष पसरवण्याचे काम करत आहे पण आपल्याला ते करायचे नाही. आपण सर्व जाती, धर्म, वंशांतील लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करायचा आहे" असे नाना पटोले म्हणतात.
Facebook link Nana Patole
https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL
Instagram link Nana Patole
https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==
Twitter link Nana Patole
https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09
YouTube link Nana Patole
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.