Savitribai Phule
Savitribai Phule sakal
Blog | ब्लॉग

Savitribai Phule: सावित्रीबाई फुलेंना घडविणाऱ्या मिसेस फॅरार - राजाराम सूर्यवंशी

सकाळ वृत्तसेवा

अमेरिकन मिशनच्या मिसेस फॅरार यांचा आज(25 जानेवारी) 161 वा स्मृतीदिवसा आहे. त्यानिमित्ताने त्यांना व त्यांनी जोतिरावांप्रमाणे सावित्रीबाई फुलेंना घडविण्यात जी ऐतिहासिक भुमिका निभावली त्याबाबत त्यांना भावपूर्ण आदरांजली ! .

युगस्त्री सावित्रीबाईंमुळे इतिहासातील कितीतरी पडद्यामागील पात्रे उजागर झाली आहेत, होत आहेत. उदा- मि. गफ्वारबेग मुंशी, लिजिटसाहेब, सगुणाबाई क्षिरसागर, फातिमा शेख, मुक्ता साळवे, व मिसेस फॅरारबाई ऊर्फ अमेरिकन मिशनच्या सिंथिया फैरार !

सिंथिया फॅरार या मुळच्या अमेरिकेच्या मराठी मिशन इन वेस्टर्न इंडिया या संस्थेने तत्कालिन अमेरिकन मिशन बोर्डाला भारतात शिक्षिका म्हणून मराठी व इंग्रजी शिकवायला अविवाहित आणि अनुभवी प्रशिक्षित शिक्षिका पाठवण्याची विनंती केली होती.

सिंथिया फॅरार या वयाच्या पंधराव्या वर्षीच अमेरिकेतील congregation church चे सभासद बनल्या होत्या. (नियमीतपणे चर्चमध्ये साप्ताहिक प्रार्थनेसाठी जमणारा समुह) तरुण मिसेस फॅरार यांना भारतात अमेरिकन मराठी मिशन संदर्भात विचारण्यात आले असता, त्यांनी हे आव्हान तात्काळ स्विकारले.

5 जून 1827 रोजी मिसेस फॅरार या बोटीने भारताकडे यायला निघाल्या व सहा महिन्याचा भयंकर दमणूक करणारा बोटीचा प्रवास करुन त्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई बंदरावर पोहचल्या व पुढच्याच आठवड्यात मुंबईतील अमेरिकन मिशनच्या शैक्षणिक कार्यात रुजू झाल्या.

त्याकाळी मुंबई हे खुप मागासलेले व सर्वबाजूंनी दलदलीने वेढलेले बेट होते. मुंबईतील सात बेटं एकमेकांना जोडण्याचं व त्यामधील खाड्या बुजविण्याचं काम ब्रिटिश प्रशासनाकडून युध्द पातळीवर सुरु होते.

तत्कालिन मुंबई केवढी होती, तिचा भौगोलिक विस्तार किती होता ? हे पाहू गेल्यास, मुंबई किल्ला (फोर्ट), चर्चगेट म्हणजे आजचा हुतात्मा चौक, आजचा सि.एस. टी. व मनपाचा परिसर. त्याच्यापुढे मुळच्या भारतीय व इतर अँग्लोइंडियन व काही धर्मांतरीतांची वसाहत होती.

यात भायखळा, परळ, वरळी, माटुंगा व वडाळा ही गावे होती. तसेच महालक्ष्मीचे रेसकोर्स हे गावाबाहेर होते. इंग्रजांच्या किल्ल्यात म्हणजे आजच्या फोर्ट इलाख्यात इंग्रजांचा कायदा चाले. किल्याच्या बाहेरच्या परिसरावर अर्थात गावांमध्ये स्थानिक जाती व त्यांच्या जातपंचायतीचा कायदा चालत असे.

1720 ते 1800 या ऐंशी वर्षांच्या कालखंडात माझंगाव, परळ, वरळी, माटुंगा, दादर, माहिम व वडाळा या बेटांमधील खाडी बुजविण्याचं कामं अहोरात्र चालू होते. व मिसेस फॅरार यांनी मुंबई बेटावर पाऊल ठेवल्यापर्यंतही काही प्रमाणात सुरुच होती.

त्यासाठी हजारो देशी हात देशावरुन कोकणातुन, पठारावरून मुंबईत पोटापाण्यासाठी येऊन राबत होते. त्यांच्या कष्टाला पारावार नव्हता. ऐवढे कष्टकरुनही या कष्टकऱ्यांना गावच्या जातीयगुलामगिरीपेक्षा मुंबईच्या या कष्टमय जीवनात समाधान लाभत असे.

कारण गावाकडे कष्टाबरोबर मानहानी, जातीय गुलामगिरी होती, तर मुंबईत फक्त कष्ट व श्रम! जातिय व सांस्कृतिक गुलामगिरीचा येथे लवलेशही नव्हता. नारायण मेघाजी लोखंडेंचे वडील व आळ्याचे सत्यशोधक रावजी पाटील याच कालखंडात अनुक्रमे ठाण्यात व मुंबईला आले होते.

मुंबईत आलेले हे कष्टकरी सडे असत. पर्यायाने मिसेस फॅरार यांना शाळा सुरु करण्यासाठी स्थानिक जनतेत फिरुन मुलं जमवावी लागत असे. या स्थानिक जनतेकडून मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत त्यांना खुप विरोध सहन करावा लागत असे. असे असतांनाही त्यांनी थोड्याच कालावधीत मुंबईत 40 मुलींची शाळा सुरु केली होती.

1827 ते 1837 अशी सतत दहा वर्षे त्यांनी मुंबईत ज्ञानदानाचे कार्य केले होते.परंतु मुंबईची दमट हवा दलदलीच्या साम्राज्यामुळे 1837 साली फॅरारबाई आजारी पडल्यात व त्यांना दोन वर्ष आजार उपचार व आरामासाठी अमेरीकेला जावे लागले.त्यातले एक वर्ष तरत् यांचे प्रवासात संपले.

1839 साली त्या परत भारतात आल्या. मुंबईचे वातावरण व त्यांच्या तब्बेतीचा पुर्वानुभव लक्षात घेऊन भारतातील अमेरिकन मराठी मिशनने यावेळी त्यांची बदली अहमदनगरला केली होती.

अहमदनगरला मिसेस फॅरार यांनी 1839 ते 1862 अशी तेवीस वर्ष शाळा उभारणीचे ऐतिहासिक कार्य केले होते. याच काळात 1842 साली नगरमध्ये सावित्रीबाई फुले यांनी मिसेस फॅरारबाई यांच्याकडून सहा महिने शालेय शिक्षण व अध्यापनाचे धडे गिरवले होते.

यावेळी सावित्रीबाईंबरोबर फातिमा शेख ही नगरला होत्या. या प्रशिक्षणानंतर सावित्रीबाईंनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली हा इतिहास आपणांस सर्वांना ज्ञात आहेच.

सावित्रीबाईंना घडवण्यामध्ये महात्मा फूलेंचा वाटा खुप मोठा आहेच. त्यात वादच नाही परंतु त्या खालोखाल महत्वाचा वाटा

मिसेस सिंथिया फॅरार यांचाही आहे, हे आपल्यला विसरुन चालणार नाही. अशा या महान शैक्षणिक कार्यकर्त्या, ज्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी अमेरिकेतुन भारतात येऊन, ज्ञानव्रतीचे व्रत घेऊन आपल्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत अहमदनगरमध्ये शैक्षणिक कार्य करता करता 25 जानेवारी 1862 रोजी अखेरचा श्वास घेतला व आपली जीवनयात्रा भारतातच संपवून आपले नाव भारतवर्षात आजरामर करुन गेल्यात.

अशा या ज्ञानव्रतीला त्यांच्या अद्वितीय शैक्षणिक कार्याबरोबर सावित्रीबाईंना घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांच्या 161 व्या स्मृतीदिनानिमित्त शतशः आभिवादन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT