Crime News
Crime News  sakal
Crime | गुन्हा

Crime News : कर्जबाजारी इंजिनिअरने केला पोटच्याच मुलीचा खून अन्...

सकाळ डिजिटल टीम

बेंगळुरू-कोलार महामार्गावरील केंदट्टीजवळील तलावात स्वतःच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फेकल्याच्या आरोपावरून कोलार पोलिसांनी राहुलला अटक केली. गुजरातमधील असणारा राहुल नोकरीच्यानिमित्ताने बेंगळुरूमध्ये स्थायिक झाला. तिथेच इंजिनिअर म्हणून नोकरी करू लागला. पण राहुलची नोकरी गेली आणि बिटकॉइन व्यवसायात आर्थिक नुकसान झाले. ज्यांच्याकडून त्याने कर्ज म्हणून पैसे घेतले होते त्यांच्या भीतीने त्याने मुलीचे जीवन संपवण्याचा आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने सांगितले की, मला स्वतःच्या मुलीच्या हत्येचा पश्चात्ताप झाला आहे, पण माझ्यकडे कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. 15 नोव्हेंबरला राहुल जियाला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि दोघे बेपत्ता झाले होते. दोघेही घरी न परतल्याने त्यांची पत्नी भव्य हिने बागलूर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी जियाचा मृतदेह तलावात आढळला आणि पोलिसांनी राहुलचाही आत्महत्या करून मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला होता.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

राहुलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मनात आत्महत्येच्या विचार चालू होता. त्यामुळे तो सकाळपासून बेंगळुरू आणि कोलार येथे फिरला. त्याला आत्महत्येची इच्छा होती पण मुलीगी सोबत होती म्हणून तो ठोस निर्णय घेऊ शकत नव्हता.

"मी स्वत:ला आणि माझ्या मुलीला मारण्याचा बेत आखून सकाळीच घरातून निघालो होतो. पण जसजसे तास उलटत गेले, तसतसा मी गोंधळून गेलो होतो. अनेक वेळा मी घरी परतण्याचा विचार केला. पण सावकारांकडून होणारा छळ आणि पोलिस केस या विचारांनी मला थांबवले," असे राहुलने पोलिसांना सांगितले.

"तलावाजवळ गाडी थांबवून मी एका छोट्या दुकानात गेलो आणि माझ्याकडे असलेल्या थोड्या पैशातून माझ्या मुलीसाठी बिस्किटे आणि चॉकलेट्स विकत घेतली. काही वेळ मी तिच्यासोबत मागच्या सीटवर खेळलो. तिला भूक लागली म्हणून ती रडू लागली. तिने दुपारपासून जेवण केले नव्हते आणि माझ्याकडे पैसेही शिल्लक नव्हते. या असहायतेमुळे मला निर्णय घेण्यास भाग पाडले," राहुलने पोलिसांना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT