मुंबई : आजकाल लोकांना मोबाईलवर बोलताना इतर गोष्टींचा विसर पडतो. भोवताली काय चालले आहे याची जाणीवच त्यांंना नसते. अनेकदा गाडी चालवत असताना मोबाईलच्या नादात लोक रस्ता विसरतात. रस्त्याने चालताना चॅट करणे किंवा व्हिडिओ कॉलवर बोलणे यांमुळे अपघातही होऊ शकतो.
मोबाईलवर बोलत असताना अपघात झाल्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. अशीच एक दृकश्राव्य फीत सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. यात एक मुलगी रेल्वेच्या रुळांवर झोपून फोनवर बोलत आहे. ती बोलण्यात इतकी मग्न आहे की, तिच्यावरून ट्रेन निघून जाते तरी तिला कळत नाही.
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ही चित्रफीत ट्विटरवर प्रसारित केली आहे. तसेच त्यावर ‘फोनवरच्या गप्पा जास्त महत्त्वाच्या आहेत’ असेही लिहिले आहे. लोकांनीही त्यावर अनेक मजेशीर टीप्पण्या केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, ‘हिला तर मेडल मिळाले पाहिजे’. दुसऱ्याने लिहिले आहे, ‘सॉरी, बोलण्यात मग्न होते. त्यामुळे ट्रेन दिसली नाही’.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.