Crime
Crime Sakal
Crime | गुन्हा

निवृत्त अधिकाऱ्याला एका तरुणीचा फोन; ५० लाखांची केली मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने चंदननगर येथील एका निवृत्त हवाई दल अधिका-‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी मंगळवारी (ता १७) पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघांना अटक केली आहे.

दत्ता ऊर्फ यादव कु-‍हाडे (वय ४८, रा. जुन्नर) आणि उत्तम कान्हुजी कु-‍हाडे (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर नारायण जाधव (वय ३७, रा. जुन्नर), अनिल सर ऊर्फ भाऊ आणि आरती चौधरी हे संशयित आरोपी पसार झाले आहेत. चंदननगर येथील एका निवृत्त हवाई अधिका-‍याने याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी निवृत्त अधिकाऱ्याला आरती चौधरी नाव असणा-या एका तरुणीचा फोन आला. आपल्या ओळखीने कोठे नोकरी मिळेल किंवा कसे, याबाबत तिने अधिका-याकडे चौकशी केली. त्यानंतर, तिने त्यांच्याशी संपर्क वाढवला व त्यांच्या प्रेमात पडल्याचे नाटक केले. तिने त्यांना गेल्या गुरुवारी (ता. १२) नारायणगाव येथे भेटायला बोलावले होते. तेथे तिने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिचे नातेवाईक तेथे आले. या अधिकाऱ्याने आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने त्यांना सांगितले. त्यानंतर आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून या अधिकाऱ्याला प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडे ५० लाखांची मागणी केली. तडजोडीअंती अधिकाऱ्याकडून युनियन बँक ऑफ इंडियाचे १० लाख रुपयांचे तीन धनादेश जबरदस्तीने लिहून घेतले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

पैशांसाठी वारंवार फोन :

अधिका-याला सोडून दिल्यानंतर आरोपी वारंवार फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होते. त्यामुळे या अधिकाऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली. विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने सापळा रचून दोघांना अटक केली. सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवदास लहाने पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT