IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders IPL 2024 : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर ४८ तासांच्या आत कोलकता संघाला आज लगेचच पुढचा सामना खेळावा लागणार आहे.
IPL 2024 LSG vs KKR News Marathi
IPL 2024 LSG vs KKR News Marathisakal

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders IPL 2024 : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर ४८ तासांच्या आत कोलकता संघाला आज लगेचच पुढचा सामना खेळावा लागणार आहे. लखनौविरुद्धचा हा सामना त्यांच्यासाठी प्लेऑफमधील क्रमांक निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

कोलकताचा संघ १० सामन्यात १४ गुणांसह दुसऱ्या तर लखनौ १० सामन्यात १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये क्वॉलिफायर-१ हा सामना खेळण्यासाठी पहिल्या दोन स्थानावर असणे आवश्यक असते. कारण हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचतो. सध्याची स्थिती पाहता कोलकता आणि लखनौ यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित आहे. आता एकमेकांवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आज त्यांची लढाई होणार आहे.

IPL 2024 LSG vs KKR News Marathi
PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

कोलकताचा संघ मुळात धडाकेबाज फलंदाजीसाठी ओखळला जातो; परंतु शुक्रवारी मुंबईतील सामन्यात पाच बाद ५७ अशा स्थितीनंतरही त्यांना सामना २४ धावांनी जिंकण्याची किमया केली. व्यंकटेश अय्यर- मनीष पांडे यांची डाव सावरणारी फलंदाजी त्यानंतर सुनील नारायण- वरुण चक्रवर्ती यांची फिरकी गोलंदाजी तसेच मिचेल स्टार्कचा भेदक मारा आता कोलकता संघाला परिपूर्ण करणारा ठरत आहे.

सामन्याची स्थिती कशीही असली तरी आता आपण सामना जिंकू शकतो, हा आत्मविश्वास कोलकता संघाला मुंबईविरुद्धच्या सामन्यातून मिळाला आहे. फिल साल्ट आणि सुनील नारायण यांना मुंबईविरुद्ध अपयश आले होते; पण हे फलंदाज कोणत्याही क्षणी हल्लाबोल करू शकतात. एकूणच कोलकताला हरविणे लखनौसाठी सोपे नसेल.

IPL 2024 LSG vs KKR News Marathi
‘इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधारांच्या अडचणी वाढतील कारण.... दिग्गज खेळाडूचे मोठे वक्तव्य

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनौ संघाच्या कामगिरीत चढ-उतार होत राहिले आहेत. मुंबईविरुद्ध घरच्या मैदानावर १४५ धावांचे आव्हान पार करताना त्यांची दमछाक झाली होती. अखेरच्या षटकापर्यंत त्यांना लढावे लागले होते. राहुल आणि मार्कस स्टॉयनिस लवकर बाद झाले तर लखनौच्या फलंदाजीवर दडपण येते, हे सिद्ध होते. आज तर त्यांना कोलकता संघाच्या बहरलेल्या गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे.

मयंकची अनुपस्थिती

भन्नाट वेग असलेल्या मयंक यादवच्या गोलंदाजीच्या जोरावर लखनौ संघाला सुरुवातीच्या तीन सामन्यांत विजय मिळवणे सोपे झाले होते; परंतु त्याला बरगड्यांची दुखापत झाली आणि काही सामन्यांत तो खेळू शकला नाही. मुंबईविरुद्ध त्याने पुनरागमन केले; परंतु षटक अर्धवट सोडून त्याला ड्रेसिंग रुममध्ये परतावे लागले होते. तो परण्याची शक्यता दूरावत चालली आहे, अशा परिस्थितीत लखनौ संघ व्यवस्थापनाला नव्याने रचना करावी लागणार आहे; पण समोर कोलकताचे धडाकेबाज खेळाडू असणार आहेत, याचीही जाणीव त्यांना ठेवावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com