Samudrik Shastra About Itching esakal
संस्कृती

Samudra Shastra : फक्त हात-पायच नाही या अवयवांमध्ये खाज येणं सुद्धा असतं खूप शुभ...

फक्त हात किंवा पायांनाच नव्हे तर शरीराच्या इतर काही भागांमध्येही खाज सुटणे हे विशेष संकेत देतात जसे की

Lina Joshi

Samudrik Shastra About Itching : समुद्रशास्त्र हे एक असे शास्त्र आहे ज्याच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तीचे एखाद्या व्यक्तीचे हावभाव किंवा शरीराचे अवयव पाहून त्याच्याबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकता. समुद्रशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकारापासून त्याच्या बोटांच्या आणि पायाच्या आकारापर्यंत त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाची रहस्ये उघड होतात.

अनेक वेळा लोकांच्या हाताला सतत खाज सुटते, ज्याकडे ते सहसा दुर्लक्ष करतात. पण खरंतर असं नाहीये, सामुद्रिक शास्त्रानुसार हाताला खाज सुटणे हे सांगते की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले किंवा वाईट घडणार आहे.

कोणत्या हाताला खाज सुटते यावर त्याचा निर्णय अवलंबून असतो. चला जाणून घेऊया उजव्या आणि डाव्या हाताला खाज येण्याचा अर्थ काय?

उजव्या हाताला खाज सुटण्याचा अर्थ

सामुद्रिक शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचे पैशाचे नुकसान होणार आहे. त्यामुळेच उजव्या हाताला अचानक खाज सुटू लागली तर थोडी काळजी घ्या.

लक्षात ठेवा, कोणत्याही कारणाशिवाय तुम्ही पैसे खर्च करणार आहात. शिवाय बाहेर पडतांना स्वतःच्या पैशांच्या पाकीटाला जपा. आपल्याजवळ तेवढेच पैसे ठेवा ज्यांची आपल्याला गरज असेल, शिवाय बँकेतूनही तेव्हाच पैसे काढा जेव्हा गरज असेल.

डाव्या हाताला खाज सुटण्याचा अर्थ

सामुद्रिक शास्त्रामध्ये डाव्या हाताला खाज येणे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की येत्या काळात तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा पैसे मिळवण्याशी संबंधित नवीन मार्ग उघडणार आहेत.

डाव्या हाताला खाज सुटणे हे सूचित करते की पैसा तुमच्याकडे येईल, म्हणजेच पैसे तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येऊ शकतात. अशात पैसे आले की सगळे खर्चून टाकू नका, अगदी कोणाचं कर्ज देयचं असेल तरीही थोडे पैसे हातचे म्हणून राखून ठेवा.

या अवयवांमध्ये खाज येण्याचाही एक विशेष अर्थ आहे:

समुद्रशास्त्रात असेही म्हटले आहे की फक्त हात किंवा पायांनाच नव्हे तर शरीराच्या इतर काही भागांमध्येही खाज सुटणे हे विशेष संकेत देतात. जसे की,

1. डोळे खाजवणे : जर एखाद्या व्यक्तीचे डोळ्यांना खाज सुटत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्याला पैसे मिळणार आहेत.

2. पाय खाजवणे : पायात खाज येत असेल तर समजून घ्या की तुम्हाला प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते.

3. छाती खाजवणे : जर एखाद्याला छातीत खाज सुटत असेल तर समजून घ्या की वडिलोपार्जित संपत्ती लवकरच प्राप्त होणार आहे.

4. पोट खाजवणे : जर एखाद्या व्यक्तीच्या पोटाला खाज येत असेल तर त्यामागे एक खास चिन्ह लपलेले असते. त्या व्यक्तीची थोडी काळजी घ्या कारण येणाऱ्या काळात नात्यात दुरावा येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT