श्री संत गजानन महाराज sakal
संस्कृती

अकाेला : शेगावीचा ‘राणा’ रिसोड शहरात दाखल

शहरात भक्तीमय वातावरण; गण गण गणात बोतेचा गजर

सकाळ वृत्तसेवा

रिसोड : श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे रिसोड शहरात १५ जून रोजी दुपारी आगमन झाले. मागील ५३ वर्षापासून श्री संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जात असते. कोरोनामुळे गेली दोन वर्ष पालखीला खंड पडला होता. आज दुपारी तीन वाजता पालखीचे शहरात आगमन झाले.

मालेगाव नाक्यापासून बँड पथकाच्या ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीचे आगमन झाले. सकाळपासूनच शहरात पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. रस्ते स्वच्छ करून ठेवण्यात आले. रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विविध वस्तूचे तसेच जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. मागील दोन वर्षापासून पालखीमध्ये खंड पडला असल्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले.

लोणी फाटा आंबेडकर चौक सिव्हिल लाईन मार्गे पालखी येथील बाजार समितीमध्ये अतिशय भक्तीमय वातावरणात दाखल झाली. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित झाले होते. पालखीतील वारकरी यासोबतच ग्रामीण भागातून तसेच शहरातील दर्शनाकरता येणाऱ्या जवळपास २५ हजार भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. उद्या १६ जून रोजी पालखी मराठवाड्यात मार्गस्थ होणार आहे.

रांगोळ्यांनी सजल्या गल्ल्या

शेगावीचा राणा शहरात दाखल होण्याआधीच प्रत्येक रस्त्यावर सडा टाकून रांगोळी रेखाटण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी ‘श्री’च्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. रिसोड व मालेगाव तालुक्यातील भक्तांची गर्दी झाल्याने रस्ते फुलुन गेले होते. बाजार समितीत बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांनी पालखीचे स्वागत केले. बाजार समितीतील आवाराला यात्रेचे स्वरूप आले होते. बाजार समितीने पालखीतील वारकऱ्यांची चोख व्यवस्था केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT