Lucky zodiac signs in Anafa Yog 2025 sakal
संस्कृती

Anafa Yog 2025: आज वृषभ, मिथुन आणि कुंभ राशीसाठी 'अनफा योग' ठरणार लाभदायक! जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Lucky zodiac signs in Anafa Yog 2025: अनफा योग 2025 मध्ये वृषभ, मिथुन आणि कुंभ राशींसाठी आजचा दिवस विशेष लाभदायक ठरणार आहे.

Anushka Tapshalkar

Which rashi benefits from Anafa Yog 2025: आज शुक्रवार, 27 जून रोजी चंद्र पुनर्वसू नक्षत्रातून पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे आणि तो सध्या कर्क राशीत आहे. चंद्र आणि बुध एकत्र येत असल्यामुळे 'कला योग' तयार होत आहे. यासोबतच गुरु ग्रह चंद्राच्या बाराव्या स्थानात असल्यामुळे 'अनफा योग' देखील बनतो आहे.

या शुभ योगांचा फायदा खासकरून वृषभ, मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांना होण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा जाणार आहे.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा कठीण जाऊ शकतो, पण मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. तुम्हाला एखादं नवीन काम सुरू करण्याची संधी मिळू शकते किंवा काहीतरी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमचा मेहनती स्वभाव आज तुम्हाला यश आणि कौतुक दोन्ही मिळवून देईल. वैवाहिक नात्यात जर काही अडचणी असतील, तर त्या दूर करता येतील. कुटुंबीयांचा पाठिंबा तुमच्यासोबत असेल. मुलांच्या अभ्यासाशी संबंधित अडचणीही सुटतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ

आज तुमच्यासाठी चांगला दिवस ठरू शकतो. आज तुमचं उत्पन्न वाढू शकतं आणि तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील. व्यवसाय करणारे लोक एखादा धाडसी निर्णय घेऊन फायदा मिळवू शकतात. वैवाहिक नात्यात प्रेम आणि समजूत वाढेल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. जर तुम्ही प्रवास करत असाल, तर काळजीपूर्वक आणि सतर्क राहा.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. व्यवसायात अपेक्षित फायदा मिळेल, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांचा सल्ला पाळणं फायद्याचं ठरेल. चुकांवर पडदा टाकण्याऐवजी त्या स्पष्टपणे सांगून मार्गदर्शन घ्यावं, असंही सुचवलं जातंय. आज तुम्हाला समाजातील काही महत्त्वाच्या लोकांशी भेटण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि सर्जनशील कामात यश मिळेल. तुमची आर्थिक योजना यशस्वी ठरेल.

कर्क

कर्क राशीसाठी आजचा दिवस व्यवसायात फायदेशीर ठरू शकतो, पण आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आहार योग्य ठेवणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल, तर थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल आणि वरिष्ठांची मदतही मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे तुम्ही थोडं चिंतेत राहू शकता. वैवाहिक नात्यात जर पूर्वीपासून काही अडचण चालू असेल, तर ती कमी होण्याची शक्यता आहे.

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक घडामोडी घेऊन येईल. घरात जर काही वादविवाद सुरू असतील, तर ते आज संवादातून सुटू शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल, पण त्यासाठी मेहनतही खूप घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत काही थोडे बदल होऊ शकतात, पण तुम्ही तुमचे खर्च सहज पेलू शकाल. मुलांना आज यश मिळेल आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळेल.

कन्या

आज कन्या राशीसाठी दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या मार्गांनी पैसे मिळू शकतात, पण एकाच वेळी खूप कामं घेतली, तर तुम्हाला मानसिक ताण आणि गोंधळ जाणवू शकतो. विरोधकांकडून सावध राहणं गरजेचं आहे, कारण ते तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. आज तुम्हाला घरातील मोठ्यांकडून मदत आणि योग्य सल्ला मिळेल. तुमच्या बोलण्यामुळे एखाद्या मित्राला वाईट वाटू शकतं, त्यामुळे बोलताना काळजी घ्या. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला असेल आणि आवडतं खाणं मिळण्याची शक्यता आहे.

तूळ

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य पण लाभदायक ठरेल. तुमच्या सर्जनशीलतेचा तुम्हाला चांगला उपयोग करता येईल. तुमचं बोलणं आणि वागणं लोकांना आवडेल, त्यामुळे फायदा होईल. तुमच्या जोडीदाराने आज काही बोललेलं तुमच्या मनाला भावेल आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल. जर तुमची बहीण खूप दिवसांपासून नाराज असेल, तर आज बोलून तो गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळींकडूनही काही चांगला लाभ होऊ शकतो. मात्र, मुलांच्या तब्येतीकडे आज विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला जाईल, विशेषतः जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना एखाद्या मित्राच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने संधी मिळू शकते. तुम्ही घरातील लोकांच्या गरजांकडे लक्ष द्याल, त्यामुळे ते तुमच्यावर आनंदी राहतील. कुटुंबात आज चांगला संवाद आणि सहकार्य असेल. आर्थिक बाबतीत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. वैवाहिक नात्यात जोडीदाराची साथ आणि पाठिंबा मिळेल. अडकलेली काही कामंही आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.

धनु

धनू राशीसाठी आजचा दिवस चांगल्या संधी घेऊन येईल. तुम्हाला आज एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमचा सन्मान आणि प्रभाव वाढेल. मनातल्या भावना तुम्ही कुटुंबीयांशी मोकळेपणाने बोलू शकाल, त्यामुळे तुमचं मन हलकं वाटेल. वैवाहिक जीवन आनंददायक राहील. आज एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. अनोळखी व्यक्तीकडूनही काही मदत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आज तुमचं बोलणं वापरून कामं यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल.

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस आनंददायक ठरेल, असं नक्षत्र दर्शवतंय. घरात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. काही प्रलंबित कामं आज वेळेत पूर्ण करावी लागतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यानुसार जबाबदारी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. वरिष्ठांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळेल, ज्याचा फायदा होईल. व्यवसायात उत्पन्न वाढेल. बँकेशी संबंधित कामं यशस्वी होतील. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस अनुकूल आहे. मात्र, तुमच्या वागण्यात संयम ठेवणं आणि इतरांशी सौहार्दपूर्ण संवाद ठेवणं गरजेचं आहे.

कुंभ

कुंभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. खर्च वाढल्यामुळे तुम्हाला थोडी चिंता वाटू शकते. कामाच्या ठिकाणीही काही अडचणी येऊ शकतात आणि अचानक एखादं नवीन कामही तुमच्यावर सोपवलं जाऊ शकतं. पूर्वी केलेल्या एखाद्या चुकीबद्दल आज पश्चात्ताप होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात संयम ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर प्रियकर/प्रेमीचा राग तुमच्यावर येऊ शकतो. आज बाहेरचं खाणं टाळा, कारण आरोग्य थोडं कमकुवत राहू शकतं.

मीन

मीन राशीसाठी आज शुक्रवारचा दिवस आनंददायक पण थोडा खर्चिक ठरेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात, पण तणाव न घेता सकारात्मक राहिल्यास फायदा होईल. कौटुंबिक जीवनात जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल. मित्र आणि शेजाऱ्यांकडून मदत मिळू शकते. शिक्षणात चांगलं प्रदर्शन कराल आणि संशोधनासारख्या विषयांमध्ये यश मिळेल. परदेशाशी संबंधित क्षेत्रातूनही आज काही फायदा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT