ashadi wari 2023 warkari wari culture sant dyaneshwar maharaj palkhi at velapur
ashadi wari 2023 warkari wari culture sant dyaneshwar maharaj palkhi at velapur  sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : माऊलींची पालखी वेळापूर मुक्कामी

विलास काटे

वेळापूर : सकाळी रंगलेले गोल रिंगण, पंढरीसमीप आल्याच्या भावनेने वारकऱ्यांनी केलेला धावा अन् त्यानंतर वेळापूरच्या माळरानावर भारुडातून झालेली लोकरंगाची उधळण, अशी चैतन्यदायी वाटचाल करीत माऊलींचा सोहळा वेळापुरात विसावला.

पालखी सोहळा माळशिरसकरांचा निरोप घेऊन सकाळी वेळापूरकडे मार्गस्थ झाला. काल जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे सोहळ्यात चैतन्य होते. पालखी सोहळा खुडुस फाट्यावर येण्यापूर्वी हलकासा पाऊस पडला होता.

शिवाय रात्रीच्या पावसामुळे शेतशिवारात चिखल झाल्याने रिंगणातही हीच परिस्थिती होती. रिंगणात नाचतच दिंड्या गोलाकार लागल्या. दिंड्यांतून वाट काढीत पालखी रिंगणाच्या मध्यवर्ती पोचली. पालखी पोचताच अश्व रिंगणात आले.

यावेळी सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे, राजाभाऊ आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार यावेळी उपस्थित होते. फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या. भोपळे दिंडीतील मानकऱ्याने रिंगणाला तीन प्रदक्षिणा मारल्या.

नंतर उपस्थित लाखो भाविकांच्या नजरा माऊलींच्या अश्वाच्या दौडेकडे लागल्या होत्या. प्रत्येकाच्या मुखात माऊली माऊली नाम येत होते. तेवढ्यात स्वाराच्या अश्वासह माऊलींच्या अश्वाने रिंगणात दौड सुरू केली आणि माऊलींचा जयघोष झाला.

दोन फेऱ्या मारत दोन्ही अश्वांनी रिंगण रंगवले. रिंगण संपताच भाविकांनी रिंगणात अश्वांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी झुंबड उडाली. दिंड्यांमध्ये वारकऱ्यांचे खेळ रंगले होते. वारकरी देहभान होऊन नाचत होते. फुगड्या, हुतूतू दिंड्यांमध्ये सुरू होत्या.

ओल्या मातीत हे सारे खेळ खेळत होते. उडीच्या खेळानंतर रिंगणाची सांगता झाली. त्यानंतर पुन्हा सोहळा मार्गस्थ झाला. दुपारी उन्हाचा चटका जाणवत होता. पालखी दुपारच्या जेवणाच्या विसाव्यासाठी निमगाव पाटीवर थांबला.

भोजन उरकून सोहळा वेळापूरकडे चालत होता. इसबावीजवळील उतारावरून चोपदार बंधूंनी एक-एक दिंडींना धावात खाली सोडले. प्रत्येक दिंडी आणि रथ धावत उतारावरून खाली आला. खाली माळरानावर शेडगे दिंडी नंबर तीनच्या वतीने कृष्णा महाराज जोगदंड याचे मानाचे भारुड झाले. यावेळी ॲड. विकास ढगे, मालक, चोपदार तसेच ऋषिकेश मोरे उपस्थित होते.

वारी वाटचालीबाबत....

  • खुडुस फाट्यावर सकाळी ७.३० ला हलका पाऊस.

  • राजश्री जुन्नरकर हिने रिंगणात रांगोळी काढली

  • उड्डाणपुलावरून असंख्य भाविकांनी रिंगण पाहिले

  • पालखी मार्ग रुंदीकरणामुळे वाहतूक व्यवस्था सुलभ

  • वेळापूरचौकात पुलाच्या अपुऱ्या कामामुळे गैरसोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT